एस. के. जैन एअरफोर्स स्टेशनचे नवे कमांडर

By Admin | Updated: September 29, 2016 01:34 IST2016-09-29T01:33:38+5:302016-09-29T01:34:06+5:30

फेरबदल : विभास पांडे यांची अणुरक्षक अधिकारीपदी बढती

S. Of The new commander of the Jain Air Force Station | एस. के. जैन एअरफोर्स स्टेशनचे नवे कमांडर

एस. के. जैन एअरफोर्स स्टेशनचे नवे कमांडर

नाशिक : भारतीय वायुसेनेच्या ओझर स्टेशनचे कमांडर एअर कमोडर विभास पांडे यांची सिलाँग येथील एअरफोर्स पूर्व मुख्यालयात अणुरक्षक अधिकारी म्हणून बढती झाली असून त्यांच्या जागेवर येथील एअरफोर्स स्टेशन कमांडरपदी एअर कमोडर शरद कुमार जैन यांनी बुधवारी (दि.२४) पदभार स्वीकारला.
येथील वायुसेनेच्या तळावर त्यांचा पदग्रहण सोहळा परंपरागतरीत्या संचलनाने पार पडला. यावेळी विभास पांडे यांनी ११ बीआरडीच्या सहकाऱ्यांना आतापर्यंत कायम ठेवलेली गुणवत्ता यापुढेही अबाधित राखत देशाचा वैमानिक स्तर उंचावण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले.
नवनियुक्त एअर कमोडर एस. के. जैन हे १८ आॅगस्ट १९८६ रोजी भारतीय वायुसेनेत विमान अभियांत्रिकी शाखेत रुजू झाले. त्यांनी आयआयटी चेन्नईतून व्यावसायिक अभियांत्रिकी शाखेतून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून त्यांना मुख्य अभियंता म्हणून लढाऊ विमानांचा आणि एरो इंजिनचा सखोल आणि प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी ३० वर्षांच्या कार्यकाळात वायुसेनेतील अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत. वायुसेनेच्या संपर्क स्थापना, नाशिक विभागाचे अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. ४ बीआरडीच्या कमांडरपदावरही त्यांनी काम केले असून या विविध ठिकाणी त्यांनी एक कार्यकुशल अधिकारी म्हणून स्वत: ओळख निर्माण केलेली आहे.

Web Title: S. Of The new commander of the Jain Air Force Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.