‘त्या’ युवकाची हत्त्या रिक्षाच्या व्यवहारातून

By Admin | Updated: June 8, 2015 00:01 IST2015-06-08T00:00:37+5:302015-06-08T00:01:04+5:30

हनुमानवाडीतील घटना : तिघे संशयित ताब्यात

'That' s killing a young boy from the auto rickshaw | ‘त्या’ युवकाची हत्त्या रिक्षाच्या व्यवहारातून

‘त्या’ युवकाची हत्त्या रिक्षाच्या व्यवहारातून

पंचवटी : रिक्षा खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सहा जणांच्या टोळक्याने रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने वार करून, तसेच डोक्यात फरशी मारून हत्त्या केल्याची घटना मखमलाबादरोडवरील हनुमानवाडी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून, उर्वरित संशयित पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पेठरोडवरील अश्वमेघनगर परिसरात राहणाऱ्या संदीप नानासाहेब कुमावत (२७) या युवकाची सहा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून हत्त्या केली. या घटनेनंतर मयताचे नातेवाईक कल्पना कुमावत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पंचवटी पोलिसांनी राजेश खांदवे, रोहित सोनवणे, नीलेश खांदवे, राहुल खांदवे, सागर शिंदे, राजू शिंदे अशा सहा संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता, तर रात्री रोहित शिंदे, कुणाल शिंदे, राजेश खांदवे या तिघा संशयितांना ताब्यात घेतले होते.
मयत रिक्षाचालक कुमावत व परिसरात गॅरेज व्यवसाय असणाऱ्या काही युवकांमध्ये दुपारी रिक्षा खरेदी करण्याच्या व्यवहारावरून वाद झाला होता. त्यानंतर संशयितांनी रात्रीच्या सुमारास कुमावत याला वाद मिटविण्यासाठी भावबंधन मंगल कार्यालयाजवळ बोलावून घेतले होते. कुमावत आल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाले व त्यातूनच हाणामारी झाली. संशयितांनी कुमावत यास लाकडी दांडुका, फरशीने मारहाण केली.
त्यानंतर काहींनी हातातील धारदार शस्त्राने त्याच्यावर वारही केले. गंभीर जखमी अवस्थेत कुमावत याने जीव वाचविण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला; मात्र संशयितांनी त्याच्यावर हल्ला केल्याने तो जागीच ठार झाला. पोलिसांनी घटनास्थळाहून फरशी, लाकडी दांडुका व अन्य वस्तू जप्त केल्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: 'That' s killing a young boy from the auto rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.