शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पावसाळ्यापूर्वी कांद्याची विक्री करण्यासाठी धावपळ; कोरोना चाचणीसाठी शेतकऱ्यांची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 10:41 IST

Onions Market News: बारा दिवसांचा कडक लॉकडाऊन संपल्यानंतर जिल्ह्यातील बाजार समित्या सुरू झाल्या आहेत.

- संजय दुनबळेनाशिक : खरीप हंगामासाठी लागणाऱ्या भांडवलाची तयारी आणि पावसात भिजून कांद्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीकडे  कल वाढला असून, बहुतेक बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीसाठी गर्दी होत आहे. यामुळे बाजार समिती प्रशासनाला गर्दी आवरताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बारा दिवसांचा कडक लॉकडाऊन संपल्यानंतर जिल्ह्यातील बाजार समित्या सुरू झाल्या आहेत. मात्र, एकाच सत्रात केवळ ५०० वाहनांतील शेतमालाचा लिलाव होत असल्याने आपल्या वाहनाची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू  असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.  

कांद्याला मिळतोय सरासरी दर १,५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर सध्या सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी मिळत असल्याने कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.  ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीची सोय नाही त्यांना पावसाळ्यापूर्वी कांदा विकणे गरजेचे असल्याने बाजार समित्यांमध्ये गर्दी होत आहे. सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत गुरुवारी १५,००० क्विंटल कांद्याची आवक झाली होती.  

चाचणीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा : बाजार समिती आवारात येणाऱ्या प्रत्येक घटकाची कोरोना चाचणी करणे आवश्यक असल्याने बाजार समित्यांच्या आवारात अँटिजन चाचणी केंद्र सुरू केली आहेत. या केंद्रांवर चाचणी करून घेण्यासाठीही शेतकऱ्यांच्या रांगा लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एकदा केलेल्या चाचणीचा अहवाल आठ दिवस ग्राह्य धरला जात असल्याने ज्यांच्याकडे अधिक माल आहे, त्यांना वारंवार चाचणी करावी लागत आहे. 

पैशांची जमवाजमव करण्याचे आव्हान- मागील वर्षीपासून घोंगावणाऱ्या कोरोनाच्या संकटामुळे शेती पूर्णपणे अडचणीत आली आहे. - त्यात यावर्षी सर्वच वस्तूंचे दर वाढल्याने खरीप हंगामाच्या भांडवलासाठी शेतकऱ्यांना उसनवारीने तर काहींना सावकाराकडून पैसे घ्यावे लागत आहेत. - ज्यांच्याकडे शेतमाल आहे ते माल विक्रीच्या तयारीत आहेत. मात्र, बाजार समित्यांना घालून दिलेल्या नियमांमुळे दररोज ५०० वाहनांतील मालाचाच लिलाव होत आहे.- शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, खरिपासाठी भांडवल कसे उभे करावे, असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला आहे.  

बंदमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान- लॉकडाऊनच्या काळात बंदमुळे भाजीपाल्याचे लिलावही बंद होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. - भाजीपाला नाशवंत असल्याने तो मिळेल त्या भावात विकण्यासाठीही शेतकऱ्यांनी जीवाची पर्वा न करता नाशिक बाजार समितीबाहेरच वाहने उभी केली होती. यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी मनमानी किमतीने माल खरेदी केल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. 

टॅग्स :onionकांदाagricultureशेती