शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आॅक्सिजनसाठी धावपळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 01:36 IST

शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत आॅक्सिजन पुरवठा होत नसल्याने शासकीय यंत्रणांची तारांबळ उडत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाला शंभर टन अतिरिक्त आॅक्सिजन पुरवठ्याचे आश्वासन मिळाले असले तरी उत्पादक कंपनीने टॅँकर पाठविण्यास सांगितले आहे. मात्र ती व्यवस्था नसल्याने बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. दुसरीकडे महापालिकेने धावपळ सुरू केली आहे.

ठळक मुद्देटॅँकर मिळेना : महापालिकेने घातले राज्य शासनाला साकडे

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत आॅक्सिजन पुरवठा होत नसल्याने शासकीय यंत्रणांची तारांबळ उडत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाला शंभर टन अतिरिक्त आॅक्सिजन पुरवठ्याचे आश्वासन मिळाले असले तरी उत्पादक कंपनीने टॅँकर पाठविण्यास सांगितले आहे. मात्र ती व्यवस्था नसल्याने बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. दुसरीकडे महापालिकेने धावपळ सुरू केली आहे.सध्या लागत असलेल्या आॅक्सिजनच्या तुलनेत दुप्पट आॅक्सिजन उपलब्ध करून घेण्याचे ठरविले असून, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांना नोडेल आॅफिसर म्हणून नियुक्त केले आहे तसेच आॅक्सिजन आणण्यासाठी उद्योजकांकडे असलेल्या टँकरचा वापर करण्यास परवानगी देण्याची मागणी मनपाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारकडे करण्यात आल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, त्यातील गंभीर आजारी रुग्णांना विशेषत: श्वास घेण्यास त्रास होत असणाऱ्या रुग्णांना आॅक्सिजनची मागणी सातत्याने वाढत आहेत. कोरोनापूर्वी लागणाºया आॅक्सिजनच्या तुलनेत आता आठ ते दहा पट अधिक मागणी वाढली आहे. तथापि, उत्पादक कंपन्यांची मर्यादा आणि त्यांना त्यांच्या भागातील मागणीनंतर अन्य पुरवठादारांकडे लक्ष द्यावे लागत असल्याने अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे शासकीय स्तरावर केवळ स्थानिक पुरवठादारांच्या वारंवार बैठका घेतल्या जात आहेत. दोन दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सह आयुक्त माधुरी पवार यांनी मध्यस्थी करून मोठ्या उत्पादक कंपनीला शंभर टन कोटा वाढवून देण्यास प्रवृत्त केले होते. संबंधित कंपनी तयार असली तरी त्यांनी टॅँकर पाठविण्याची घातलेली अट अडचणीची ठरली आहे. स्थानिक पुरवठादारांकडे केवळ पिनॅकल या एकाच पुरवठादाराकडे एकच टॅँकर आहे. त्यामुळे अडचण होत आहे. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनीदेखील पुरवठादारांची बैठक घेतली त्यानंतर गुरुवारी (दि.१०) स्थानिक पुरवठादारांची पुन्हा अन्न व औषध विभागात बैठक झाली. मात्र तोडगा निघाला नसल्याचे समजते.मनपाचे आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीने वैद्यकीय विभागाची तातडीने बैठक घेतली. सध्याची गरज बघता शहरासाठी अतिरिक्त २० टक्के अधिकचा आॅक्सिजन पुरवठा वाढविण्यात येणार आहे.काळजीचे कारण नाहीकोरोनाचे रु ग्ण वाढत असले तरी नागरिकांनी काळजी करण्याची गरज नसून उपचारासाठी आरोग्य व्यवस्था सक्षम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आॅक्सिजनची पुरेशी व्यवस्था असल्याचेही आयुक्त कैलास जाधव यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी शासनाला मदतीचे आवाहन केले असून लवकरच पुरेसा आॅक्सिजन साठा उपलब्ध होईल, नागरिकांनी चिंता करू नये.असे त्यांनी सांगितले.१ नाशिक महापालिकेनेदेखील आॅक्सिजन पुरवठ्यासाठी धावपळ सुरू केली आहे. शहराला दररोज सरासरी ३५ मेट्रिक टन लिक्विड आॅक्सिजनची आवश्यकता आहे.२ महापालिकेला देखील आॅक्सिजन मिळविण्यात अडचणी येत असल्याने अतिरिक्तआयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांना नोडल आॅफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे,३ महापालिकेला लागणाºया आॅक्सिजनसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे अतिरिक्त मागणी नोंदविण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या