शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

खरिपाच्या कामांची लगीनघाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 00:29 IST

पेठ : मागील आठवड्यात निसर्ग चक्रीवादळाच्या निमित्ताने पेठ तालुक्यात पहिलाच पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाच्या शेतकामांना वेग आला असून, भात बियाणाची पेरणी सुरू झाली आहे.

पेठ : मागील आठवड्यात निसर्ग चक्रीवादळाच्या निमित्ताने पेठ तालुक्यात पहिलाच पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाच्या शेतकामांना वेग आला असून, भात बियाणाची पेरणी सुरू झाली आहे. तालुक्यात साधारण १४५ गावांत खरीप हंगामात भात, नागली, वरी, तूर, उडीद हीपिके प्रामुख्याने घेतली जातात. तालुक्यात खरीप पिकांचे सरासरी पेरणी क्षेत्र २३ हजार ६३९ हेक्टर असून, सन २०१९-२० या आर्थिक वर्षात पड क्षेत्रात कृषी विभागाकडून आदिवासी उपयोजनेतून झालेल्या क्षेत्र उपचराच्या कामांमुळे सुमारे ३०० हेक्टर क्षेत्र भात पिकाखाली येणार असून, खरीप पिकांमध्ये बदल होऊन खरिपाच्या प्रत्यक्ष पेरणी क्षेत्रात वाढ होणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पेठ कृषी विभागातर्फे खरीप हंगामपूर्व तयारी करण्याच्या दृष्टीने शेतकरी बांधवांमध्ये जनजागृती केली जात आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात किमान शारीरिकअंतर ठेवून गावबैठका व शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहेत.सदर गावबैठकांतर्गत खरीप हंगामातील प्रमुख पिकांच्या उत्पादकतेत वाढ करण्यासंदर्भात बीजप्रक्रिया, खत व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन, सामूहिक रोपवाटिका तयार करणे, चार सूत्री भात लागवड, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड/रोग व्यवस्थापन, शेतकरी गट बांधणी करणे, पीकविमा काढणेसंबधी शेतकरी बैठकाद्वारे मार्गदर्शन व जनजागृती केली जात आहे.-------------------कृषिनिविष्ठा खरेदी करताना विक्री केंद्रात शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये यासाठी शेतकरी गटाच्या माध्यमातून एकत्रित खताची मागणी नोंदविणे व संबंधित गटामार्फत शेतकरी बांधवांना थेट बांधावर निविष्ठा पुरवठा करण्याबाबत नियोजन सुरू असून, आजपर्यंत १२६ गटांच्या माध्यमातून ४७० क्विंटल बियाणे व ७१५ टन खताचा पुरवठा थेट बांधावर करण्यात आला आहे.यंदा मान्सून समाधानकारक असल्याने व शेतकऱ्यांना वेळेत निविष्ठा उपलब्ध झाल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पेठ तालुक्यात२६ गावांत भात पिकाच्या शेतीशाळा घेण्याचे नियोजनअसून, शेतीशाळेत प्रामुख्याने महिला शेतकºयांचा सहभाग घेण्यात येणार आहे. नवीन तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवले जाणार आहे.---------------------तालुक्यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत ९० हेक्टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिकांचे नियोजन असून, त्याअंतर्गत प्रत्येकी १० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाचे ४, नागली पिकाचे ४ तर उडीद पिकाचे २ प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यामध्ये शेतकºयांना बियाणे, खते व औषधे इत्यादी निविष्ठा पुरवल्या जाणार आहेत.- अरविंद पगारे, तालुका कृषी अधिकारी, पेठ

टॅग्स :Nashikनाशिक