नागरिकांच्या तक्रारीसाठी आता ग्रामीण पोलिसांचे ‘व्हॉट्सअॅप’
By Admin | Updated: October 16, 2015 21:59 IST2015-10-16T21:58:06+5:302015-10-16T21:59:01+5:30
ग्रामीण पोलिसांचा स्मार्टनेस : स्वतंत्र पोलिसांची नेमणूक, २४ तास कार्यरत

नागरिकांच्या तक्रारीसाठी आता ग्रामीण पोलिसांचे ‘व्हॉट्सअॅप’
नाशिक : जिल्ह्यातील कायदा
व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईटचा
उपयोग करून घेण्याचा चांगला निर्णय ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी घेतला आहे़ ग्रामीण शहरासह ग्रामीण भागात मोठ्या संख्येने वापरले जाणारे मोबाइलमधील व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून ते जिल्'ातील नागरिकांशी संवाद साधणार असून दोन व्हॉट्स अॅप क्रमांकही त्यांनी जाहीर केले
आहेत़ आपल्या परिसरातील
अवैध धंदे, गुन्हेविषयक माहिती नागरिकांनी बिनदिक्कतपणे ग्रामीण पोलिसांच्या या व्हॉट्स अॅप क्रमांकावर देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे़
जिल्हाभरातील नागरिकांनी केलेल्या तक्रारी / सूचनांची
तत्काळ दखल घेतली जाणार आहे़ तसेच यामुळे पोलिसांना माहितीबरोबरच घटनास्थळी पोहोचून कार्यवाही करण्यास चांगलीच मदत होणार आहे़ यामध्ये नागरिकांना वाहतूक नियंत्रण समस्या, शस्त्र / इतर परवाने, अर्ज चौकशी, गुन्हेगारांबाबत माहिती, दहशतवादी कृत्याबाबत माहिती, समाजात शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासंबंधाचे संदेश, नागरिकांच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबतच्या तक्रारी, घटनास्थळांचे फोटो अथवा व्हिडीओ क्लिप्स पाठविता येणार आहे़
या व्हॉट्स अॅप क्रमांकावर नागरिकांना रोजच्या दैनंदिन जीवनात रस्त्यावर, गल्लीत वा परिसरात घडणारे अनुचित प्रकार, दंगल, अफवा पसरविणे, मारहाणीचे प्रकार, घातक शस्त्र व स्फोटके बाळगताना आढळल्यास, शाळा/ महाविद्यालयांची ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री, मुलींची छेडछाड, टवाळखोर, दोन धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करणारे फलक, व्हिडीओ क्लिप, परिसरातील संशयित व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या बेवारस वस्तू आदिंची माहिती देता येणार आहे़
नाशिक ग्रामीण पोलिसांनी जिल्'ातील नागरिकांसाठी खुले केलेल्या या दोन व्हॉट्स अॅप क्रमांकामुळे जनतेच्या मनात पोलिसांबाबत विश्वास व सहकार्य निर्माण होण्यास तसेच सामान्य व पीडित व्यक्तींना तातडीने मदत
मिळून गुन्हेगारीस अटकाव करण्यासाठी निश्चित मदत मिळणार
आहे़ (प्रतिनिधी)
’ नाशिक : मुंबईतील रहिवासी रमेशचंद्र सीताराम सोनी हे रामकुंडावर अंघोळीसाठी आले असता चोरट्यांनी त्यांचा मोबाइल व रोख रक्कम असा सात हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़