शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

'मेरी'चे कार्यालय फोडून ३८ हजारांचा ऐवज लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 17:08 IST

पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरकारी मालमत्ता, अस्थापनांना अज्ञात भुरट्या चोरांच्या टोळीने लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देपोलिसांची दिवस-रात्रीची गस्त थंडावल्याचे स्पष्ट होतेसर्रासपणे परिसरात घरफोड्या, जबरी चोऱ्या

नाशिक : पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन केंद्रात (मेरी) अज्ञात चोरट्यांनी शनिवारी (दि.७) निर्मिती कक्षाच्या अंतर्गत असलेल्या कार्यालय व भांडार कक्षाचे पत्रे उचकटून प्रवेश करत अ‍ॅल्युमिनियम, तांब्याचे सुमारे ११० किलो भंगारासह वेल्डींग यंत्र, उपकरणे असा एकूण ३८ हजार ८०० रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना मंगळवारी (दि.१०) उघडकीस आली.पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरकारी मालमत्ता, अस्थापनांना अज्ञात भुरट्या चोरांच्या टोळीने लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. चोरट्यांनी शनिवारीच अहल्यादेवी होळकर पूलाच्या लागून ‘वॉटर कर्टन’चे (इंद्रधनुष्य कारंजा) १५ एलईडी दिवे व ४० मीटरची केबल गायब केल्याची घटना घडली. एकूणच पंचवटी भागातील सरकारी अस्थापनांसह मालमत्ता असुरक्षित झाल्याचे बोलले जात आहे. सर्रासपणे परिसरात घरफोड्या, जबरी चोऱ्या घडत असल्याने पोलिसांची दिवस-रात्रीची गस्त थंडावल्याचे स्पष्ट होते.मेरीच्या आवारातील कार्यालय व भांडारगृहातून चोरट्यांनी १सिंगल फेज वेल्डिंग यंत्र, बाष्पीभवन मापक उपकरणाचे २६ नग,१०५ किलो तांब्याचे भंगार, ९किलोचे अ‍ॅल्युमिनियम भंगार असा एकूण सुमारे ३८ हजार ८०० रूपयांचा ऐवज लांबविल्याची फिर्याद वैभव प्रतापराव पाटील (४३,रा. गंगापूररोड) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास हवालदार मिसाळ करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी