शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

सटाणा पालिकेच्या पोटनिवडणुकीत रुपाली सोनवणे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 1:01 AM

सटाणा : येथील नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ साठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत मंगळवारी (दि.२०) अर्जछाननीत विश्वास सोनवणे यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याने शहरविकास आघडीच्या रुपाली संदीप सोनवणे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

ठळक मुद्दे२६ मार्च रोजी बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येणार रुपाली संदीप सोनवणे यांचा एकमेव अर्ज शिल्लक

सटाणा : येथील नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ साठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत मंगळवारी (दि.२०) अर्जछाननीत विश्वास सोनवणे यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याने शहरविकास आघडीच्या रुपाली संदीप सोनवणे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. येथील पालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ (अ) चे नगरसेवक व शहरविकास आघाडीचे गटनेते संदीप सोनवणे यांचे जानेवारी महिन्यात निधन झाले. त्यामुळे रिक्त जागेसाठी ६ एप्रिलला पोटनिवडणूक होणार होती. यासाठी दिवंगत नगरसेवक संदीप पोपट सोनवणे यांच्या पत्नी रुपाली सोनवणे व विश्वास परशराम सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत प्रवीण महाजन यांनी विश्वास सोनवणे यांनी जातप्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत न जोडल्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळला. रूपाली सोनवणे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. २६ मार्च रोजी बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी महाजन यांनी दिली.