सटाणा : येथील नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ साठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत मंगळवारी (दि.२०) अर्जछाननीत विश्वास सोनवणे यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याने शहरविकास आघडीच्या रुपाली संदीप सोनवणे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. येथील पालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ (अ) चे नगरसेवक व शहरविकास आघाडीचे गटनेते संदीप सोनवणे यांचे जानेवारी महिन्यात निधन झाले. त्यामुळे रिक्त जागेसाठी ६ एप्रिलला पोटनिवडणूक होणार होती. यासाठी दिवंगत नगरसेवक संदीप पोपट सोनवणे यांच्या पत्नी रुपाली सोनवणे व विश्वास परशराम सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत प्रवीण महाजन यांनी विश्वास सोनवणे यांनी जातप्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत न जोडल्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळला. रूपाली सोनवणे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. २६ मार्च रोजी बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी महाजन यांनी दिली.
सटाणा पालिकेच्या पोटनिवडणुकीत रुपाली सोनवणे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 01:01 IST
सटाणा : येथील नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ साठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत मंगळवारी (दि.२०) अर्जछाननीत विश्वास सोनवणे यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याने शहरविकास आघडीच्या रुपाली संदीप सोनवणे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सटाणा पालिकेच्या पोटनिवडणुकीत रुपाली सोनवणे बिनविरोध
ठळक मुद्दे२६ मार्च रोजी बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येणार रुपाली संदीप सोनवणे यांचा एकमेव अर्ज शिल्लक