सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:08 IST2017-08-23T00:08:29+5:302017-08-23T00:08:38+5:30
लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघ्या काही दिवसांचा कालावधी राहिल्याने पंचवटी परिसरातील गणेशोत्सव मित्रमंडळांनी तयारीचा वेग वाढविला आहे. गणेशोत्सव तयारी पूर्ण करण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते रात्रीचा दिवस करीत आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची धावपळ
पंचवटी : लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघ्या काही दिवसांचा कालावधी राहिल्याने पंचवटी परिसरातील गणेशोत्सव मित्रमंडळांनी तयारीचा वेग वाढविला आहे. गणेशोत्सव तयारी पूर्ण करण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते रात्रीचा दिवस करीत आहेत. विघ्नहर्त्याच्या आगमनाला मोजकेच दिवस शिल्लक असल्याने मंडळांचे कार्यकर्ते देणगी जमा करणे, सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदी करणे, मनपा तसेच पोलीस ठाण्याची रीतसर परवानगी घेणे, वीज मीटरसाठी वीज कंपनीला अर्ज करणे या कामात व्यस्त आहेत, तर मंडप उभारणीचे काम सुरू आहे. पंचवटी परिसरातील छोट्या, मोठ्या मंडळांनी मंडप उभारणी करण्याचे काम जवळपास पूर्ण केले आहे, तर काही मंडळांचे काम सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने पावसामुळे मंडपातून पावसाचे पाणी देखाव्यांवर पडून नुकसान होण्याची शक्यता असल्याने अनेक मंडळांनी मंडप उभारणी केल्यानंतर पुन्हा मंडपावर प्लॅस्टिक कपडा तसेच पत्रे, ताडपत्री टाकून मंडप संरक्षित करण्याचे काम सुरू केले आहे.