चालत्या वाहनातील थरार : नाशकात वाळूमाफियांची दादागिरी, गुन्हा दाखल

By Admin | Updated: March 30, 2015 00:09 IST2015-03-30T00:08:44+5:302015-03-30T00:09:10+5:30

तलाठ्यास ट्रकमधून फेकले

Running vehicle tremors: In the Nashik, the dowry of sandmafia, filed a complaint | चालत्या वाहनातील थरार : नाशकात वाळूमाफियांची दादागिरी, गुन्हा दाखल

चालत्या वाहनातील थरार : नाशकात वाळूमाफियांची दादागिरी, गुन्हा दाखल

सिडको : वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाळूमाफियांची दादागिरी चांगलीच वाढली असून, सरकारी अधिकाऱ्यांनी जप्त केलेला ट्रक तहसील कार्यालयात जमा करण्याच्या नावाखाली लहवितचे तलाठी अरुण पाटील यांना चालत्या ट्रकमधून खाली ढकलून देत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी सकाळी घडली़ या घटनेनंतर ट्रकचालकाने ट्रकसह पलायन केले, तर दुसऱ्या घटनेत एक ट्रक जप्त करण्यात आला आहे़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
अनधिकृत गौण खनिजाची चोरटी वाहतूक रोखून वाळूमाफियांवर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार गणेश राठोड यांनी बुधवारी (दि़ २५) मंडल अधिकारी व तलाठी यांच्या बैठकीत दिले होते़ त्यानुसार तहसीलदार राठोड यांनी तालुक्यातील मंडल अधिकारी व तलाठी यांची दोन भरारी पथके तयार केली़ त्यातील पहिल्या पथकात पी़ डी़ गोंडाळे (मंडल अधिकारी, देवळाली), अरुण पाटील (तलाठी, लहवित), अण्णा डावरे (तलाठी, देवळाली), नीळकंठ उगले (तलाठी, पाथर्डी), एऩ एस़ बनसोड (तलाठी, पिंपळद), तर दुसऱ्या पथकात एस़ एम़ शेख (मंडल अधिकारी, शिंदे), आऱ आऱ कागदे (तलाठी, पळसे), बी़ एस़ काळे (तलाठी, शिंदे), सुनील चांडोले (तलाठी, नाणेगाव) एस़ जी़ साळी (तलाठी एकलहरे) यांचा समावेश होता़
रविवारी (दि़ २९) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास पहिले पथक नाशिक- मुंबई उड्डाणपुलाच्या खाली तपोवन हॉटेलसमोरील सर्व्हिस रोडवर, (पान ५ वर)

तर दुसरे पथक नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या पाथर्डी भागातील उड्डाण पुलावर तैनात करण्यात आले होते़ सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास नाशिकहून मुंबईकडे जाणारा एक दहा चाकी ट्रक वाळू घेऊन जात होता़ या ट्रकला नंबरप्लेट नव्हती तसेच ट्रॉलीवर असलेला नंबरही ग्रीस लावून पूर्णपणे झाकलेला होता़ या ट्रकबाबत संशय आल्याने पहिल्या पथकाने या ट्रकला थांबवून ट्रकचालकास त्याचे व मालकाचे नाव ट्रकची कागदपत्रे, परवाने, वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याने काहीही नसल्याने सांगितले.
त्यामुळे भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी चालकास ट्रक तहसीलदार कार्यालयात जमा करण्यास सांगून या ट्रकमध्ये तलाठी अरुण पाटील स्वत: बसले़ चालकाने हुंडाई शोरूमजवळ ट्रक थांबवून ट्रक पकडल्याची माहिती साथीदारांना मोबाइलवरून देऊन बोलावून घेतले़ यामुळे पाटील यांनी ट्रकचालकाचा मोबाइल जमा करून घेतल्यानंतर काही वेळातच सफेद रंगाच्या कारमधून दोन व बुलेटवरून एक असे तीन साथीदार तिथे आले़ त्यांनी पाटील यांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली़

Web Title: Running vehicle tremors: In the Nashik, the dowry of sandmafia, filed a complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.