धावपटू राठींकडून ८० किलोमीटर अंतर १३ तासांत पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 16:40 IST2018-12-04T16:39:25+5:302018-12-04T16:40:07+5:30
नाशिक : येथील गोल्फ क्लबवर चालण्याचा व धावण्याचा नियमित सराव करणारे जॉगर्स क्लबचे सदस्य दिलीप राठी यांनी पंजाब रनमध्ये भाग घेऊन ८० किलोमीटर अंतर अवघ्या १३ तासांत पूर्ण केले. याबद्दल जॉगर्स क्लबतर्फे माजी महापौर अशोक मुर्तडक व सुनील बागुल यांच्या हस्ते राठी यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

धावपटू राठींकडून ८० किलोमीटर अंतर १३ तासांत पूर्ण
नाशिक : येथील गोल्फ क्लबवर चालण्याचा व धावण्याचा नियमित सराव करणारे जॉगर्स क्लबचे सदस्य दिलीप राठी यांनी पंजाब रनमध्ये भाग घेऊन ८० किलोमीटर अंतर अवघ्या १३ तासांत पूर्ण केले. याबद्दल जॉगर्स क्लबतर्फे माजी महापौर अशोक मुर्तडक व सुनील बागुल यांच्या हस्ते राठी यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
यावेळी जॉगर्स क्लबचे अध्यक्ष दिलीप पाटील, माजी नगरसेवक हरिभाऊ लोणारी, नगरसेवक वैशाली भोसले, मनोज भोसले, नरेंद्र छाजेड, डॉ. नारायण देवगावकर, नाना निकुंभ, उदय कोठावदे, विनय बिरारी, दीपक काळे, जगदीश गडकरी, हेमंत गोसावी, अजय गुप्ता, भरत गुरव आदी उपस्थित होते.
कृष्णा नागरे यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप पाटील यांनी आभार मानले.