शहरं
Join us  
Trending Stories
1
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
2
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
3
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
4
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
5
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
6
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
7
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
8
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
9
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
10
कली म्हणतात तो हाच; जो आता घराघरात शिरलाय, नव्हे तर मनामनात शिरलाय!
11
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
12
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?
13
वडिलांकडे फी भरण्यासाठी नव्हते पैसे, गरिबीत गेलं बालपण; आज आहे 485 कोटींची मालकीण
14
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
15
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
16
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल
17
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
18
सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड
19
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
20
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत

रेमडेसिविरसाठी जळगाव, पालघरहून नाशिकला धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 1:24 AM

शहरासह सर्वत्रच रेमडेसिविरची टंचाई जाणवत असली, तरी राज्यभरातच अशी अवस्था आहे. त्यामुळे रेमडेसिविर मिळविण्यासाठी सर्वच रुग्णांच्या नातेवाइकांची परजिल्ह्यात धावपळ सुरू आहे. नाशिकमध्येही टंचाई असताना, उत्तर महाराष्ट्रातूनच नव्हे, तर मुंबई, पालघर आणि नजीकच्या गुजरातमधूनही चौकशी केली जात आहे.

ठळक मुद्देइंजेक्शन देता का, इंजेक्शन : रुग्णांच्या नातेवाइकांची बिकट अवस्था 

नाशिक :  शहरासह सर्वत्रच रेमडेसिविरची टंचाई जाणवत असली, तरी राज्यभरातच अशी अवस्था आहे. त्यामुळे रेमडेसिविर मिळविण्यासाठी सर्वच रुग्णांच्या नातेवाइकांची परजिल्ह्यात धावपळ सुरू आहे. नाशिकमध्येही टंचाई असताना, उत्तर महाराष्ट्रातूनच नव्हे, तर मुंबई, पालघर आणि नजीकच्या गुजरातमधूनही चौकशी केली जात आहे. कोरोनाची ही दुसरी लाट असल्याचे मानले जात आहे. ही लाट इतकी भयंकर आहे की, त्यामुळे बहुतांश जिल्ह्यात बाधितांसाठी साध्या खाटाही मिळत नाही. नाशिकमध्ये महापालिका आणि अन्य शासकीय यंत्रणांनी काहीही दावे केले, तरी साधे बेडही मिळणे दुर्मीळ झाले आहे. ओळखीपाळखी आणि अधिकारी नेत्यांच्या संपर्काशिवाय बेड मिळणे कठीण झाले आहे. त्यातच कोरोना रुग्णावर उपचार म्हणून रेमडेसिविर इंजेक्शन्सचा वापर केला जात असून, गेल्या काही दिवसांपासून या इंजेक्शन्सचीही टंचाई जाणवत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णांच्या नातेवाइकांचे हाल झाले. महापालिका ही निमशासकीय संस्था असून, रेमडेसिविर इंजेक्शनअभावी तीन दिवस काढावे लागले. खासगी रुग्णालयांची अवस्था यापेक्षा बिकट आहे. रेमडेसिविरचा काळाबाजार शिगेला पोहोचल्याने, आता जिल्हा प्रशासनाने सूत्र हाती घेऊन त्याचे थेट रुग्णालयांना वितरण सुरू केले असले, तरी अद्यापही पुरवठा मुबलक झाल्याशिवाय उपयोग नाही. नाशिक शहराला सहा ते साडेसहा इंजेक्शन दररोज लागतात, असे सांगितले जाते. मात्र, पुरवठाच नसल्याने रुग्णालयांना तरी पुरवठा कसा हेाणार, असा प्रश्न आहे.  नाशिकमध्येच नव्हे, तर राज्यात बहुतांश ठिकाणी अशीच स्थिती असल्याने, रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविरसाठी विविध ठिकाणी धाव घेत आहेत. जळगाव, धुळे, अहमदनगर इतकेच नव्हे, तर मुंबई, पालघरसारख्या ठिकाणहून नागरिक संपर्क साधून इंजेक्शन्सचा शोध घेत आहेत.पाच दहा हजार जास्त घ्या, पण...रेमडेसिविर हे कोराेनाबाधितांवर उपचारासाठी प्रभावी आहे किंवा नाही, याबाबत वेगवेगळी मते आहेत. मात्र, सध्या तरी उपचारासाठी हे इंजेक्शन वापरले जात आहे. सुमारे साडेपाच हजार रुपयांना एक इंजेक्शन असले, तरी त्यासाठी नातेवाईक वाट्टेल ती रक्कम मेाजायला तयार होतात. एक इंजेक्शन घेण्यासाठी मुंबई, पालघर, जळगावमधून खास गाडी घेऊन इंजेक्शन नेण्याची तयारी दर्शवत आहेत. इतकी या इंजेक्शन्सची निकड भासत आहे. इंजेक्शनसाठी धावाधावनाशिक महापालिकेने २० हजार रेमडेसिविर इंजेक्शन मागविल्याचे वृत्त सोशल मीडियावर झळकल्यानंतर, एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला थेट बडोदा येथून परिचिताने फोन केला आणि दोन इंजेक्शनसाठी गाडी पाठविण्याची तयारी दर्शवली.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या