आॅक्सिजनअभावी रुग्णालयात धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 00:50 IST2020-09-08T22:28:35+5:302020-09-09T00:50:30+5:30
नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात लिक्विड आॅक्सिजनच्या दोन टाक्यांपैकी एक संपली आणि धावपळ उडाली. आॅक्सिजन वेळेत न पुरवल्यास होणारी अडचण लक्षात घेऊन एका उत्पादक कंपनीकडून तातडीने सिलिंडर पुरवण्यात आले. आणखी आठ टन आॅक्सिजन मंगळवारी उपलब्ध होणार आहे.

आॅक्सिजनअभावी रुग्णालयात धावपळ
नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात लिक्विड आॅक्सिजनच्या दोन टाक्यांपैकी एक संपली आणि धावपळ उडाली. आॅक्सिजन वेळेत न पुरवल्यास होणारी अडचण लक्षात घेऊन एका उत्पादक कंपनीकडून तातडीने सिलिंडर पुरवण्यात आले. आणखी आठ टन आॅक्सिजन मंगळवारी उपलब्ध होणार आहे.
आॅक्सिजनचा पुरवठा झाल्यानंतर धावपळ करणाऱ्या अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. सध्या आॅक्सिजनची मागणी वाढल्याने गोरगरीब रुग्ण याच रुग्णालयात येत असतात. त्यातच सध्या आॅक्सिजनचा अनियमित पुरवठा होत आहे.
या रुग्णालयाला सध्या चारशे आॅक्सिजन सिलिंडर पुरवावे लागतात. त्यामुळे एकूणच मागणी वाढत असताना सोमवारी (दि. ७) येथील आॅक्सिजनची एक टाकी संपली आणि एकच शिल्लक असल्याने धावपळ उडाली.
यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला. सहआयुक्त माधुरी पवार यांनी तातडीने पुरवठादारांशी संपर्क साधला आणि उत्पादकांशी संपर्क साधून सिलिंडर उपलब्ध करून दिले.