शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

‘त्या’ तोतया कर्मचायांच्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:48 IST

वीजमीटर रिडिंग व जनगणनेचा बहाणा करून महापालिका व महावितरण कंपनीचे कर्मचारी असल्याची बतावणी करत सहजरीत्या घरामध्ये प्रवेश करून दागिन्यांची लूट करणाºया त्या दोघा लुटारूंच्या मुसक्या बांधण्यास गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाला यश आले आहे. दोघा भामट्यांकडून सुमारे तीन लाख ९६ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे.

ठळक मुद्देतिसरा डोळा ठरला कर्दनकाळतीन दिवसांचा ठोकला तळमुख्य संशयित आरोपीची रुग्णालयवारी

नाशिक : वीजमीटर रिडिंग व जनगणनेचा बहाणा करून महापालिका व महावितरण कंपनीचे कर्मचारी असल्याची बतावणी करत सहजरीत्या घरामध्ये प्रवेश करून दागिन्यांची लूट करणाºया त्या दोघा लुटारूंच्या मुसक्या बांधण्यास गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाला यश आले आहे. दोघा भामट्यांकडून सुमारे तीन लाख ९६ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आठवडाभरापूर्वी पंचवटी, म्हसरूळ, उपनगर परिसरातील दोघा लुटारूंनी जनगणना विभाग, महावितरणचे कर्मचारी असल्याचे सांगून वीज बिल भरणा, वायरिंग तपासणीची कारणे दाखवत घरांमध्ये प्रवेश मिळवून घरातील वृद्ध महिलांना विविध प्रश्नांमध्ये गुरफटून ठेवत त्यांच्या अंगावरील दागिने काढण्यास दोघे प्रवृत्त करत होते. यासाठी हे दोघे भामटे तुळशीची पाने, पाणी हातात ठेवून काही मंत्रजाप करत आजारपण दूर करण्याच्या भुलथापाही देत होते. यावेळी वृद्ध महिलांनी दागिने काढून ठेवल्यास नजर चुकवून ते दागिने घेत घरातून पोबारा करत होते. याबाबत वरील उपनगरीय भागांमध्ये लागोपाठ अशाच पद्धतीने दागिने लुटल्याच्या घटना घडल्याने नागरिक धास्तावले होते. अशाच एका भागात अपार्टमेंटच्या परिसरात दोघे भामटे पोहचले असता, त्यांचे चेहरे तिसºया डोळ्याने टिपले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला. दरम्यान, फुटेजमधील संशयित श्रीरामपूरमधील असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस नाईक संजय ताजणे यांना मिळाली. त्यांनी याप्रकरणी वरिष्ठ अधिकाºयांना माहिती देत पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, उपनिरीक्षक रवींद्र सहारे, नितीन भालेराव, परमेश्वर दराडे, मधुकर साबळे यांचे पथक श्रीरामपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले.तिसरा डोळा ठरला कर्दनकाळऔरंगाबादमधील वैजापूर पोलीस ठाण्यात यांच्यावर चार ते पाच गुन्हे दाखल आहेत. महसूलचे कर्मचारी असल्याची बतावणी करत त्यांनी तेथे लूट केली होती. पंचवटी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये कैद झालेले हे भामटे श्रीरामपूरमधील सधन कुटुंबातील आहे. श्रीरामपूरपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पडेगावमध्ये लाड याचा बंगला असून, लुटीमधील सोने त्याने बंगल्यात दडवून ठेवले होते. मागील चार दिवसांपासून गुन्हे शाखेचे देवडे व त्यांचे पथक मुद्देमाल हस्तगत करण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांनी सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या, कर्णफुले गुन्ह्यात वापरलेली दुचाकी बजाज सीटी-१०० (एम.एच. १७ बी.डब्लू. ९०९६) जप्त केली आहे.तीन दिवसांचा ठोकला तळगुन्हे शाखेचे सहायक आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पथक श्रीरामपूर भागात तीन दिवस तळ ठोकून होते. श्रीरामपूर तालुक्यात शोधमोहीम राबविताना नखाते यांनी दिलेल्या निर्देशानुसार पथकाने संशयास्पद ठिकाणी चाचपणी सुरू केली. यावेळी बेलापूर रस्त्यावरून पडेगाव येथून शंकर रामदास लाड याला ताब्यात घेण्यास पथकाला यश आले. त्यानंतर बोंबले वस्ती टिळकनगर, श्रीरामपूरमधून साथीदार संतोष एकनाथ वायकर यास अटक केली. यांनी उपनगर, पंचवटी परिसरांत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे करीत आहेत.मुख्य संशयित आरोपीची रुग्णालयवारीया गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असलेला लाड हा उच्च रक्तदाबाचा रुग्ण असल्यामुळे गुन्हे शाखेच्या तपास पथकाने त्याला ताब्यात घेतल्यापासून रुग्णालयवारी घडवावी लागली. कारण उच्च रक्तदाबामुळे त्याची प्रकृती खालावली होती. प्रथम बिटको रुग्णालय व तेथून जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्याला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. सूत्रधार लाड असल्यामुळे लुटीमधील दागिने हस्तगत करण्यासाठी त्याची प्रकृती सुधारण्याची पोलिसांना प्रतीक्षा करावी लागली. चार दिवसांच्या पोलीस कोठडीत त्याने गुन्ह्याची कबुली देत दागिन्यांचा पत्ता सांगितला. पोलिसांना मुद्देमाल हस्तगत करण्यास यश आले असून, दोघा भामट्यांनी पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायलीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा