शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शहरात लॉकडाऊन लागू करण्याची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 17:46 IST

शहरात कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने येत्या दोन दिवसांत संपूर्णपणे लॉकडाऊन केला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भातील कोणतीही चर्चा अथवा प्रस्ताव नसून केवळ अफवा पसरविल्या जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्दे सोशल मीडियावर पसरविले जातायेत गैरसमजनिव्वळ चर्चा

नाशिक : शहरात कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने येत्या दोन दिवसांत संपूर्णपणे लॉकडाऊन केला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भातील कोणतीही चर्चा अथवा प्रस्ताव नसून केवळ अफवा पसरविल्या जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अनेक शहरांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. तेथील स्थानिक प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. काही शहरांनी दहा, तर काही शहरांनी पंधरा दिवसांसाठीचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. अशाच प्रकारे नाशिकमध्येदेखील लॉकडाऊन जाहीर होणार असल्याच्या चर्चेला तोंड फुटले आणि लॉकडाऊन करण्यासंदर्भातील अफवा वेगाने पसरत आहे.शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचेदेखील प्रमाण वाढले आहे. कन्टन्मेंट झोनदेखील कमी झाले आहेत. रुग्ण आढळणा-या भागात तत्काळ उपाययोजनादेखील केल्या जात आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाने जाहीर केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील ४ हजार ७८९ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर २ हजार १४० जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्णांवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून व्यापक प्रयत्न सुरू आहेत. सायंकाळी ७ नंतर पोलिसांनी संचारबंदी लागू केलेली आहे. महापालिका बाजारपेठेत सम-विषम तारखांना दुकानांना परवानगी देण्यात आलेली आहे. नागरिकांना गर्दी कमी करण्याबाबत सातत्याने जनजागृती केली जात आहे.शहरातील परिस्थितीबाबत काही प्रमाणात नागरिकांमध्येदेखील भीती आहे. बाजारपेठेतील गर्दी कमी होताना दिसत नाही तर सुरक्षिततेच्या नियमांचे गांभीर्य राखले जात नसल्यानेदेखील चिंता वाढलेली आहे. प्रशासनापुढे कोरोना नियंत्रणासाठीचा मोठा प्रश्न असून त्यादृष्टीने सर्व नियोजन केले जात आहे. या सा-या परिस्थितीमुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबतची अफवा पसरत आहे. वास्तविक जिल्हा अथवा मनपा प्रशासनाकडून लॉकडाऊन संदर्भातील कोणतीही चर्चा नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकcollectorजिल्हाधिकारी