मुक्तिधाममध्ये रंगला रामजन्मोत्सव सोहळा
By Admin | Updated: April 5, 2017 00:41 IST2017-04-05T00:41:30+5:302017-04-05T00:41:52+5:30
मुक्तिधाममध्ये रंगला रामजन्मोत्सव सोहळा

मुक्तिधाममध्ये रंगला रामजन्मोत्सव सोहळा
नाशिकरोड : परिसरातील विविध मंदिरांमध्ये श्रीराम जन्मोत्सव मंगळवारी दुपारी विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीराम नवमीनिमित्त दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.
मुक्तिधाम, बिर्ला मंदिर, देवळालीगाव श्रीराम मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर, गाडेकर मळा श्री साईबाबा मंदिर, दत्तमंदिर रोड दत्तमंदिर आदि विविध मंदिरांमध्ये श्रीराम नवमीनिमित्त मंगळवारी सकाळी पूजा-अर्चा करण्यात आली. दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.