रम्मी राजपूतची मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:12 IST2021-05-29T04:12:44+5:302021-05-29T04:12:44+5:30
नाशिक : आनंदवली येथील रमेश मंडलिक हत्या प्रकरणातील भूमाफिया फरार रम्मी राजपूत याच्यासह जगदीश मंडलिक याला पकडण्यासाठी पोलिसांनी सत्र ...

रम्मी राजपूतची मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू
नाशिक : आनंदवली येथील रमेश मंडलिक हत्या प्रकरणातील भूमाफिया फरार रम्मी राजपूत याच्यासह जगदीश मंडलिक याला पकडण्यासाठी पोलिसांनी सत्र न्यायालयातून स्टँडिंग वॉरंट मिळविले आहे, तसेच दोन्ही फरार आरोपींची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रियाही पोलिसांनी सुरू केली आहे.
आनंदवली येथील सर्वे नं. ६९/१ गंगापूर रोड, नाशिक येथील शेतीमध्ये पिकाला पाणी सोडण्याकरिता गेलेले रमेश मंडलिक यांना संघटित टोळीचा मुख्य सूत्रधार सचिन त्रंबक मंडलिक याने त्याचे साथीदार अक्षय जयराम मंडलिक, भूषण भीमराज मोटकरी, सोमनाथ काशीनाथ मंडलिक, दत्तात्रय काशीनाथ मंडलिक, नितीन पोपट खैर, आबासाहेब पाराजी भडांगे, भगवान बाळू चांगले, बाळासाहेब बारकू कोल्हे, गणेश भाऊसाहेब काळे, सागर शिवाजी ठाकरे, वैभव अनिल वराडे, जगदीश त्रंबक मंडलिक, रम्मी परमजितसिंग राजपूत, मुक्ता एकनाथ मोटकरी अशांनी गुन्ह्याचा कट करून गुन्ह्यातील साथीदार मारेकऱ्यांमार्फत धारदार शस्त्राने गळ्यावर, हातावर, चेहऱ्यावर वार करून गंभीर जखमी करून ठार केले होते. या गुन्ह्याच्या तपासात हा गुन्हा संघटित टोळीने केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी तपासी अधिकारी यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करून हा तपास सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यांनी गुन्ह्याचा मास्टर माईंड भूमाफिया रम्मी परमजिसिंग राजपूत व जगदीश त्रंबक मंडलिक हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असल्याने त्यांना पकडण्यासाठी सत्र न्यायालयातून स्टँडिंग वॉरंट मिळविले आहे, तसेच फरार आरोपींच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती घेण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. दरम्यान, फरार आरोपी रम्मी परमजिसिंग राजपूत व जगदीश त्रंबक मंडलिक हे फरार राहिल्यास त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.