सत्ताधारी एकमेकांसमोर ठाकणार उभे

By Admin | Updated: August 25, 2015 23:49 IST2015-08-25T23:48:39+5:302015-08-25T23:49:11+5:30

फैज बॅँक निवडणूक : ३,८२१ एकूण मतदार, मतभेद चव्हाट्यावर

The ruling parties stand in front of each other | सत्ताधारी एकमेकांसमोर ठाकणार उभे

सत्ताधारी एकमेकांसमोर ठाकणार उभे

नाशिक : जुन्या नाशकातील दि फैज मर्कन्टाईल सहकारी बॅँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. बॅँकेच्या मुख्य कार्यालयात निवडणुकीची लगबग पहावयास मिळत आहे. सत्ताधारी संचालक मंडळामधील मतभेदामुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. सत्तारूढ गटामधील मतभेदांमुळे निवडणुकीमध्ये बॅँकेची सत्ता राखण्यासाठी सत्ताधारी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांच्या सदस्यांकडून लगबग सुरू झाली आहे. सोमवारी (दि.३१) प्राप्त नामनिर्देशन अर्जांची छाननी होणार आहे. १५ सप्टेंबरपर्यंत माघारीची मुदत असून, त्यानंतर दुसऱ्या दिवशी निवडणूक रिंगणातील उमेदवारांना निशाणीचे वाटप करण्यात येणार आहे. २६ सप्टेंबरला २०१५-२०२० कालवधीपर्यंतच्या पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान घेण्यात येणार आहे. बँकेचे एकूण ३८२१ मतदार आहेत.
मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ केला जाणार आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून निकाल घोषित करण्यात येईल. सत्ताधाऱ्यांमधील वादामुळे बॅँकेच्या निवडणुकीत संचालकांमध्येच रस्सीखेच पहावयास मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. अद्याप ५० अर्जांची विक्री झाली असून महिला राखीव, सर्वसाधारण, अनुसूचित जाती या मतदार संघांसाठी प्रत्येकी एक असे एकूण तीन अर्ज मंगळवारी प्राप्त झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: The ruling parties stand in front of each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.