शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

नियम धाब्यावर, काम मात्र सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 10:45 PM

सटाणा शहर पाणीपुरवठा योजनेचे काम करताना सटाणा नगर परिषद व ठेकेदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता रस्त्यालगत खोदकाम करून रस्त्याचे नुकसान केल्याचे समोर आल्यानंतर बांधकाम विभागाने दंडात्मक कारवाई करून शासनाच्या एप्रिल २००६च्या परिपत्रकाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार पाइपलाइन टाकण्यास परवानगी दिली. मात्र शासनाच्या व बांधकाम विभागाच्या नियमांना तिलांजली देत अटी व शर्तींचा भंग करून काठरा गावापासून पुढे काम सुरू असल्याची तक्र ार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी केली आहे.

ठळक मुद्देसटाणा पाणीपुरवठा योजनेतील ठेकेदारावर कारवाईची मागणी

कळवण : सटाणा शहर पाणीपुरवठा योजनेचे काम करताना सटाणा नगर परिषद व ठेकेदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता रस्त्यालगत खोदकाम करून रस्त्याचे नुकसान केल्याचे समोर आल्यानंतर बांधकाम विभागाने दंडात्मक कारवाई करून शासनाच्या एप्रिल २००६च्या परिपत्रकाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार पाइपलाइन टाकण्यास परवानगी दिली. मात्र शासनाच्या व बांधकाम विभागाच्या नियमांना तिलांजली देत अटी व शर्तींचा भंग करून काठरा गावापासून पुढे काम सुरू असल्याची तक्र ार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी केली आहे.दरम्यान पाइपलाइन जाणाऱ्या राज्यमार्ग २१ वरील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील नियुक्त अभियंता सटाणा शहरातील असल्याने ठेकेदाराला कृपाशीर्वाद लाभला असल्याने रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटर बाहेरऐवजी आत पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. बांधकाम विभागाचे नियम धाब्यावर बसवल्याची तक्र ार पवार यांनी केली आहे. परवानगी न घेता बेकायदेशीर खोदकाम करून राज्य महामार्गाचे नुकसान केल्याबद्दल सटाणा नगर परिषदेवर व संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जयश्री पवार यांच्यासह कृती समितीच्या सदस्यांनी तहसील कार्यालयात तासभर ठिय्या आंदोलन करून अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व तहसीलदार यांना मागणीचे निवेदन दिले होते.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रणजित हांडे यांनी ६ जुलै रोजी काम बंद करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता रवींद्र घुले यांना दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता काम सुरू करण्यात आल्याचे समोर आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागानेसटाणा नगर परिषद व ठेकेदार यांना नोटिसीद्वारे काम बंद करण्यास सांगितले होते. सहा दिवस काम बंद राहिल्यानंतर १२ जुलै रोजी बांधकाम विभागाच्या परवानगीने व दंड भरून काम सुरु करण्यात आले.सटाणा शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामात व्यत्यय नको म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागावर थेट मंत्रालयातून दबावतंत्राचा वापर झाला. आॅनलाइन कागदपत्रांची जुळवाजुळव करून सार्वजनिक बांधकाम विभागाने सटाणा नगर परिषदेवर लाखो रु पयांची दंडात्मक कारवाई करून नियम व अटी, शर्थी लागू करून पाइपलाइन टाकण्यासाठी परवानगी दिली. मात्र दिलेल्या परवानगी व नियमाप्रमाणे कुठेही काम होताना दिसत नाही. १५ मीटर बाहेर पाइपलाइन टाकण्याऐवजी १५ मीटरच्या आत टाकण्यात आली आहे. बांधकाम विभागाने परवानगीचा भंग झाला म्हणून पाइपलाइन काढून टाकावी, अशी मागणी जयश्री पवार, कॉँग्रेसचे महेंद्र हिरे, माकपचे हेमंत पाटील, संदीप वाघ, कारभारी आहेर, किशोर पवार यांनी केली आहे.पाइपलाइनमुळे रस्ता खराब झाला आहे. चिखलामुळे गाड्या घसरून पडल्या तरी तक्र ार करायची कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुनंद परिसरातील एसटी बससेवा चिखलामुळे बंद झाल्याने काठरा गावापासून परिसरातील २० खेडे व पाड्यावरील आदिवासींना पायी प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाने आदिवासी बांधवांच्या प्रश्नाची सोडवणूक करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwater transportजलवाहतूक