नेमबाजी स्पर्धेत रुद्राक्षची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 08:52 PM2019-10-31T20:52:28+5:302019-10-31T20:53:06+5:30

मालेगाव : कोल्हापूरला झालेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत रूद्राक्ष खैरनार याने ३५३ गुणांची कमाई करीत राष्ट्रीय शालेय रायफल व पिस्तोल नेमबाजी स्पर्धेसाठी त्याची निवड झाली.

 Rudraksh opted for shooting competition | नेमबाजी स्पर्धेत रुद्राक्षची निवड

नेमबाजी स्पर्धेत रुद्राक्षची निवड

Next

मालेगाव : कोल्हापूरला झालेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत रूद्राक्ष खैरनार याने ३५३ गुणांची कमाई करीत राष्ट्रीय शालेय रायफल व पिस्तोल नेमबाजी स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. येथील लिटील एन्जल्स इंग्लिश मेडीअम व मालेगाव स्पोर्ट्स नर्सरीचा नेमबाज रूद्राक्ष खैरनार याने ३५३ गुण मिळवीत राष्ट्रीय स्पर्धेकरिता पात्र झाला आहे. ३ ते ८ नोव्हेंबर रोजी (भोपाळ) मध्यप्रदेश या ठिकाणी स्पर्धा होणार आहेत. कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत नाशिक विभाग, औरंगाबाद विभाग, कोकण विभाग, अमरावती विभाग, नागपूर विभाग व पुणे विभाग येथून सुमारे २४ नेमबाज सहभागी झाले होते. यात १४ वर्षाखालील (इयत्ता ६-८) पिस्तोल नेमबाजी गटात ३५३ गुण मिळवून रूद्राक्ष खैरनार याने तृतीय क्रमांक मिळविला. याच गटात प्रथम क्रमांक कोल्हापूर अक्षय कामत, द्वितीय क्रमांक पुणे स्वराज भोंडवे यास मिळाला.विजेत्यांना जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे, तालुका क्रीडाधिकारी सचिन चव्हाण, तालुका क्रीडाधिकारी बालाजी बरबडे, तालुका क्रीडाधिकारी विकास माने, तालुका क्रीडाधिकारी सुधाकर जमादार यांचे हस्ते गौरविण्यात आले. मुख्याध्यापक प्रकाश जगताप, मंजू ढंढारिया, क्रीडा शिक्षक विनोद माळी, बाळासाहेब अहिरे, राहुल आहिरे यांचे त्यास मार्गदर्शन लाभले.

Web Title:  Rudraksh opted for shooting competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक