रुद्रा, शिखरेवाडी मंडळांची अंतिम फेरीत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:08 IST2021-02-22T04:08:56+5:302021-02-22T04:08:56+5:30

नाशिक : जिल्ह्यातील ३२व्या किशोर व किशोरी जिल्हा अजिंक्यपद व निवडचाचणी कबड्डी स्पर्धेत किशोर गटात रुद्रा स्पोर्ट्स क्लब, ब्राह्मणवाडे ...

Rudra, Shikharwadi circles beat in the final | रुद्रा, शिखरेवाडी मंडळांची अंतिम फेरीत धडक

रुद्रा, शिखरेवाडी मंडळांची अंतिम फेरीत धडक

नाशिक : जिल्ह्यातील ३२व्या किशोर व किशोरी जिल्हा अजिंक्यपद व निवडचाचणी कबड्डी स्पर्धेत किशोर गटात रुद्रा स्पोर्ट्स क्लब, ब्राह्मणवाडे व नाशिकरोडच्या शिखरेवाडी क्रीडा मंडळाने अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या सहकार्याने जिल्हा कबड्डी असोसिएशन, क्रीडा प्रबोधिनी, नाशिक व क्रीडा आघाडी भारतीय जनता पार्टी, नाशिक शहर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे करण्यात आले आहे.

किशोर गटाच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात रुद्रा ब्राह्मणवाडे या संघाने अनिकेत कटारे, प्रसाद दिघोळे, वैभव गिते, अजय जाधव, ओंकार जाधव, ऋषिकेश भोजने, चैतन्य बोडके यांच्या सांघिक खेळाच्या जोरावर जय बजरंग शिंगवे यांचा ३९ विरुद्ध १८ असा १९ गुणांनी पराभव केला. दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात शिखरेवाडी क्रीडा मंडळ, नाशिक रोड या संघाने क्रीडा प्रबोधिनी, नाशिक या संघाचा ५२ विरुद्ध १७ असा ३५ गुणांनी दणदणीत पराभव करत शानदार अंतिम फेरीत प्रवेश केला. विजयी संघाकडून ऋषिकेश दौगे, शदिर शेख, कुणाल आव्हाड, आदित्य उगले, अजित धोगडे, अविनाश शिंदे यांनी दमदार खेळ केला.

फोटो

राजू ठाकरे देणार आहे.

Web Title: Rudra, Shikharwadi circles beat in the final