व्यंकटेश पतसंस्थेत आर.टी.जी.एस. सेवेस प्रारंभ
By Admin | Updated: July 19, 2014 01:11 IST2014-07-18T22:38:00+5:302014-07-19T01:11:03+5:30
चांदवड : येथील व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्थेत आर.टी.जी.एस. व एन.ई.एफ.टी. सेवेचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला.

व्यंकटेश पतसंस्थेत आर.टी.जी.एस. सेवेस प्रारंभ
चांदवड : येथील व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्थेत आर.टी.जी.एस. व एन.ई.एफ.टी. सेवेचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला. अध्यक्षस्थानी संस्थापक अशोक व्यवहारे होेते, तर प्र्रमुख मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ व्यवस्थापक चंद्रशेखर जोशी, व्यापार बॅँकिंग व्यवस्थापक अमोल पाटील, अध्यक्ष अशोक देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र कबाडे, संचालक दीपक व्यवहारे, विजय सांबर, महेश गुजराथी, अॅड. किशोर व्यवहारे, अरुण तासकर, अशपाक खान, व्यवस्थापक संतोष सुतारे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक वरिष्ठ व्यवस्थापक चंद्रशेखर जोशी, व्यापार बॅँकिंग व्यवस्थापक अमोल पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व स्वागत अध्यक्ष अशोक देशमुख यांनी केले, तर सूत्रसंचालन दीपक व्यवहारे आभार राजेंद्र लिंगायत यांनी मानले. कार्यक्रमास जय योगेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप गारे, रमेश जाधव, सुशील पलोड, सचिन क्षत्रिय, सुभाष गुजराथी, बाबा पाटील, संजय आचलिया, मधुकर पेंढारी, राहुल अग्रवाल, मुश्ताक शेख आदिंसह चांदवड शहरातील व्यापारी बांधव उपस्थित होते. ( वाणिज्य प्रतिनिधी )