शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

 शाळास्तरावरच होणार आरटीई प्रक्रिया ; शाळाच ठरविणार प्रवेशाचे वेळापत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 14:35 IST

कोरोनाच्या फैलावामुळे प्रभावित झालेली नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील आरटीई प्रवेशप्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता सुरू होणार आहे. परंतु या प्रक्रियेतून यावर्षी कें द्र स्तरावर होणार पडताळी प्रक्रिया रद्द करण्यात आली असून, आता थेट शाळास्तरावरच ही प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे.

ठळक मुद्देआरटीईतील केंद्रस्तर पडताळणी प्रक्रिया रद्द थेट शाळास्तरावर राबविली जाणार पडताळणी आणि प्रवेश

नाशिक : कोरोनाच्या फैलावामुळे प्रभावित झालेली नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील आरटीई प्रवेशप्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता सुरू होणार आहे. परंतु या प्रक्रियेतून यावर्षी कें द्र स्तरावर होणार पडताळी प्रक्रिया रद्द करण्यात आली असून, आता थेट शाळास्तरावरच ही प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. आरटीई प्रवेशप्रक्रियेत सहभागी शाळा स्थानिक स्तरावर त्यांचे वेळापत्रक निश्चित करून ही प्रवेश राबवू शकणार आहे. त्यामुळे यापूर्वी १७ व १८ मार्चला आॅनलाइन लॉटरी काढल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे, अशा विद्यार्थ्यांनी संबंधित शाळांकडे विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेविषयी चौकशी करावी लागणार आहे. शिक्षण विभागाने आरटीई पोर्टलवर दिलेल्या सूचनांनुसार, शैक्षणिक वर्ष २०२०-२१करिता राबविण्यात येणाºया प्रवेशप्रक्रियेअंतर्गत ज्या बालकांची लॉटरीद्वारा निवड झाली आहे. त्यांनी शाळेने दिलेल्या तारखेला शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळांकडून स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात येणार असून, या वेळापत्रकानुसार प्रवेशप्रक्रियत सहभागी होऊ न शकणाºया पालकांना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन संधी दिल्या जाणार आहेत. तसेच लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेशाचा दिनांक मेसेज (एसएमएस) द्वारे कळविला जाणार आहे. परंतु पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरही प्रवेशाची तारीख या ठिकाणी अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. त्याचप्रमाणे शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये व प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना सोबत नेऊ नये अशा सूचनाही करण्यात आल्या असून, शाळांना प्रवेशद्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता सध्या शाळेत जाऊ नये. त्यांच्याकरिता स्वतंत्र सूचना आरटीई पोर्टलवर दिल्या जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. 

प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे :पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शाळेत जाताना लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आर.टी.ई. पोर्टलवरील हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून पालकांना शाळेत घेऊन जावी लागणार आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थी