शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईची प्रवेशप्रक्रिया लांबली ; पालकांना दुसऱ्या सोडतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 16:17 IST

शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (आरटीई)मागास व आर्थिक  दुर्बळ घटकांतीव विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवर प्रेवशासाठी राबविण्यात येणारी प्रवेशाची प्रक्रिया यंदा तब्बल दीड ते दोन महिने उशीराने सुरु झाल्यानंतरही या  प्रक्रियेत अजूनही दिरंगाईच सुरू असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देआरटीई प्रवेश प्रक्रियेत दिरंगाई विद्यार्थी, पालकांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा

नाशिक  : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) मागास व आर्थिक  दुर्बळ घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवर प्रेवशासाठी राबविण्यात येणारी प्रवेशाची प्रक्रिया यंदा तब्बल दीड ते दोन महिने उशीराने सुरु झाल्यानंतरही या  प्रक्रियेत अजूनही दिरंगाईच सुरू असल्याचे दिसून येत आहे. आरटीईची पहिली सोडत जाहीर झाल्यानंतर प्रवेशासाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती.  याकालावधीत आतापर्यंत २ हजार ४८४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून प्रवेशासाठीची मूदत १० मे रोजी संपली. त्यानंतर सहा दिवस उलटूनही पुढील प्रवेशप्रक्रियेबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने नाशिकसह राज्यभरातील  प्रवेशोत्सूक विद्यार्थ्यांच्या पालकांचे लक्ष दुसऱ्या सोडतीकडे लागले असून यात नाशिकमधील सुमारे १२ हजार ७० पालकांचा समावेश आहे.  आरटीई अंतर्गत शाळांमध्ये २५ टक्के बालकांना प्रवेश देण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने ८ एप्रिल रोजी पहिली सोडत जाहीर केली होती. यातील पहिल्या यादीत नावे असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पहिल्यांदा २६ एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. मात्र, पालकांच्या मागणीनुसार त्यात ४ मेपर्यंत वाढ करण्यात आली होती.त्यानंतर पुन्हा सहा दिवसांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १० मे पर्यंत २ हजार ४८४ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. अजूनही नाशिक शहर व जिल्ह्यातील १२ हजारांवर विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असून त्यांचे लक्ष आता दुसऱ्या सोडतीकडे लागले आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाRight To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थी