शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशप्र्रक्रिया संशयाच्या घेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:04 IST

आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी काही पालकांनी अर्ज करताना खोटे पत्ते व चुकीचे अंतर नमूद केल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर असाच आणखी एक प्रकार एका पालकाने गुरू गोविंदसिंग स्कूलमधील पडताळणी समिती व तक्रार निवारण समितीच्या निदर्शनास आणून दिला होता.

नाशिक : आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी काही पालकांनी अर्ज करताना खोटे पत्ते व चुकीचे अंतर नमूद केल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर असाच आणखी एक प्रकार एका पालकाने गुरू गोविंदसिंग स्कूलमधील पडताळणी समिती व तक्रार निवारण समितीच्या निदर्शनास आणून दिला होता.आठ दिवसांचा कालावधी होऊनही या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसून संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेशही अबाधित आहे. त्यामुळे तक्रार करणाºया पालकाने पडताळणी समिती व तक्रार निवारण समिती विरोधात थेट शिक्षण उपसंचालकांकडे लेखी तक्रार केल्याने आरटीई प्रवेशप्रक्रिया संशयाच्या घेºयात सापडली आहे.आरटीई अंतर्गत पाल्यास प्रवेश मिळावा, यासाठी काही पालकांना प्रवेश अर्जात खोटे पत्ते तसेच खोटे अंतर नमूद केल्याचे पहिली सोडत जाहीर झाल्यानंतर निदर्शनास आले आहे.विशिष्ट शाळेतच प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या घराचे प्रत्यक्षातील अंतर आणि अर्जावरील अंतर यात फरक दिसून येत  आहे. पहिल्या सोडतीतून वंचित राहिलेल्या पालकांनी हा मुद्दा उपस्थित करत मनपा शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी उदय देवरे यांच्याकडे दाद मागितली होती. त्यावर देवरे यांनी लक्ष घालण्याच्या सूचना संबंधितांना केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही या अर्जावर कोणताही निर्णय झाला नाही.कारवाईकडे पालकांचे लक्षतक्रारकर्ते पालक संदीप पाटील यांनी पडताळणी समिती व तक्रार निवारण समितीच्या विरोधात थेट शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केल्याने संपूर्ण आरटीई प्रक्रियाच संशयाच्या घेºयात सापडली असून, या प्रकरणी शिक्षण उपसंचालकांक डून काय कारवाई होणार याकडे प्रतीक्षेत असलेल्या पालकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा