राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत देणार ब्राह्मणगावी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:40 IST2017-12-01T23:57:08+5:302017-12-02T00:40:58+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ५ डिसेंबर रोजी सायंकाळी संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते प्रवीण पोपटराव शेवाळे यांच्या कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत देणार ब्राह्मणगावी भेट
ब्राह्मणगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ५ डिसेंबर रोजी सायंकाळी संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते प्रवीण
पोपटराव शेवाळे यांच्या कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेणार आहेत. गेल्या वर्षी भागवत यांनी प्रवीणच्या आईवडिलांना भेटीचे आश्वासन दिले होते.
प्रवीण शेवाळे यांचे आईवडील मालेगाव तालुक्यातील टाकळी येथील असून, गेल्या २७ वर्षांपासून ब्राह्मणगावी शिवणकाम व शेती करून आपला चरितार्थ चालवितात. प्रवीण त्यांना एकुलता एक मुलगा असून, खडतर परिस्थितीत त्याने आपले एमएसडब्लूपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. लहानपणापासून संघ शाखेत जात असल्याने त्याच्या कार्याची तळमळ पाहून संघानेही त्याचेवर मोठी जबाबदारी देत शिलाँग, मेघालय, गुवाहाटी आदी दुर्गम ठिकाणी पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम पाहत आहे. भागवत आपल्या सर्वसामान्य कुटुंबात येत असल्याने शेवाळे कुटुंबीयांसह गावात उत्साहाचे वातावरण आहे.