शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी लाख रुपये मदत करावी - अंबादास दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 17:11 IST

हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना या अस्मानी संकटातून वाचविण्यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना साकडे घालणार आहोत.

बाजीराव कमानकर

सायखेडा (जि. नाशिक) : निफाड तालुक्यात सलग चार दिवस अवकाळी पाऊस झाल्याने नुकसान झालेल्या द्राक्ष, कांदा, गहू यासह भाजीपाला पिकांचे तात्काळ सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये मदत सरकारने करावी. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना या अस्मानी संकटातून वाचविण्यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना साकडे घालणार आहोत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत सरकारला धारेवर धरणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी दिली. चांदोरी येथे नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार अनिल कदम, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, चांदोरीचे सरपंच विनायक खरात माजी सरपंच संदीप टर्ले, शिवसेना तालुका प्रमुख सुधीर कराड, खंडू बोडके यासह शेतकरी उपस्थित होते.

चांदोरी येथील बाळासाहेब आहेर या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची पाहणी केली. कांदा उत्पादक सोमनाथ सोनवणे यांच्या कांद्याची पाहणी केली. तसेच उपस्थित शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत त्यांनी द्राक्ष बागेसह कांदा, गहू व भाजीपाला या पिकांचीही पाहणी करत सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, महिला आघाडीच्या अध्यक्षा भारती जाधव, सुलभा पवार, करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके पाटील, तहसीलदार शरद घोरपडे, बीडीओ संदीप कराड, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ढेमसे, सोमनाथ बस्ते, संजय भोज, दौलत टरले, प्रवीण कोरडे, संजय कोरडे, रवी आहेर, विष्णू कोरडे, अमर आहेर, अभिजित शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.कांदा उत्पादकांची थट्टा

दानवे म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल अनुदान देऊन थट्टा केली आहे. राज्यात सर्वत्र अवकाळीने शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. तरीही शिंदे सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणे घेणे नसून डिसेंबरमध्ये जाहीर केलेली मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नसल्याची टीका करत दानवे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

 

टॅग्स :NashikनाशिकAmbadas Danweyअंबादास दानवे