येवल्यात कांद्याला ७०० रु पये भाव
By Admin | Updated: July 29, 2016 22:47 IST2016-07-29T22:34:01+5:302016-07-29T22:47:30+5:30
अंदरसूल : १०२८ गोण्यांची आवक; मोठ्या प्रमाणावर कांदा पडून

येवल्यात कांद्याला ७०० रु पये भाव
येवला : येवला बाजार समितीत २४१३ गोण्या कांदा आवक झाली. सध्या नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा चाळीत पडून आहे. आडत आणि नियमनमुक्ती निर्णयाचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे. सोमवारपर्यंत निर्णय अपेक्षित असल्याचे येवल्याच्या व्यापारी संघटनेचे म्हणणे आहे.
दरम्यान, येवला कांदा मार्केटवर गोणी पद्धतीमुळे केवळ १० टक्के कांदा आवक आहे. अडतीसह नियमनमुक्तीचा निर्णय भिजत पडला तर यात शेतकरी भरडला जाणार आहे. दीपावली केवळ ९० दिवसांवर आली आहे. शिवाय दिवाळीपर्यंत मार्केटचा सुटीचा कालावधी वगळता केवळ ५१ दिवस कांदा मार्केट चालणार
आहे. शिवाय आॅगस्टमध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील कांदा मोठ्या प्रमाणावर मार्केटमध्ये येईल.
यामुळे कांद्याचे भाव पुन्हा कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिक जिल्ह्यात चाळींमधून शिल्लक असलेल्या कांद्याचा वांधा होऊ नये व शेतकरी आणखी अडचणीत येऊ नये यासाठी आडतीचा व नियमनमुक्तीचा निर्णय युद्धपातळीवर होण्याची प्रतीक्षा आहे. (वार्ताहर)