आरपीआयच्या ‘सामाजिक समरसता अभियानाचा’ नाशकातून शुभारंभ
By Admin | Updated: June 23, 2015 00:40 IST2015-06-23T00:37:31+5:302015-06-23T00:40:51+5:30
आरपीआयच्या ‘सामाजिक समरसता अभियानाचा’ नाशकातून शुभारंभ

आरपीआयच्या ‘सामाजिक समरसता अभियानाचा’ नाशकातून शुभारंभ
नाशिक : समाजात जातीय सलोखा वाढावा यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) पक्षातर्फे संपूर्ण राज्यात ‘सामाजिक समरसता अभियान’ राबविले जाणार आहे़ या अभियानास नाशिकपासून प्रारंभ होणार असून, मंगळवारी (दि़३०) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ लोंढे म्हणाले की, उपनगर येथील इच्छामणी मंगल कार्यालयात खासदार आठवलेंच्या हस्ते दुपारी चार वाजता या अभियानाचे उद्घाटन होणार आहे़ याबरोबरच खासदार निधीतून एक कार्डियाक अॅम्ब्युलन्स व्हॅनदेखील मंजूर झाली असून, तिचे उद्घाटन करण्याचाही मानस आहे़ या अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी आमदार, खासदार, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, ज्येष्ठ पत्रकार उत्तमराव कांबळे तसेच नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्'ांतून पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत़ खासदार आठवलेंच्या उपस्थितीत इगतपुरी येथे झालेल्या बैठकीत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष, पक्षाची ध्येयधोरणे, समाजात जातीय सलोखा वाढावा या उद्देशाने हे अभियान सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ त्यानुसार या अभियानाचा प्रारंभ होणार असून, त्याची सुरुवात नाशिकमधून होत असल्याने ही गौरवाची गोष्ट आहे़ खासदार आठवलेंच्या उपस्थितीत पक्षातील विविध पदांवर फेरबदल, तसेच नवीन नियुक्त्यादेखील केल्या जाणार आहेत़ यावेळी शहराध्यक्ष पवन क्षीरसागर, शहर संघटक दीपक डोके, सुभाष बोराडे, प्रीती भालेराव, विजया केदारे, बाळासाहेब गायकवाड, दीपक सावंत, विनोद जाधव, अमोल पगारे, विशाल साळवे यांच्यासह जिल्हातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़(प्रतिनिधी)