रोइंगपटू दत्तू भोकनळ बारावीच्या परिक्षेला हजर
By Admin | Updated: February 28, 2017 18:16 IST2017-02-28T18:16:35+5:302017-02-28T18:16:47+5:30
चांदवड तालुक्यातील तळेगावरोहीचा सुपूत्र आंतरराष्ट्रीय रोइंगपटू दत्तू भोकनळ याने आज लासलगाव येथील परीक्षा केंद्रावर बारावीचा पेपर दिला.

रोइंगपटू दत्तू भोकनळ बारावीच्या परिक्षेला हजर
>ऑनलाइन लोकमत
लासलगाव (नाशिक), दि. 28 - चांदवड तालुक्यातील तळेगावरोहीचा सुपूत्र आंतरराष्ट्रीय रोइंगपटू दत्तू भोकनळ याने आज लासलगाव येथील परीक्षा केंद्रावर बारावीचा पेपर दिला.
दतू १० वीनंतर सहा वर्षांचा गॅप घेतल्यानंतर बारावी परिक्षेस बसला आहे. दत्तू आपल्यासोबत परीक्षेला बसले असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. दत्तू सर्व विषयांचे पेपर देणार असल्याची माहिती दत्तूचे मामा रविंद्र वाकचौरे यांनी दिली आहे.
दत्तुचे सर्वत्र कौतुक होत असून बारावीच्या परीक्षेसाठी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. दत्तूने रोईंग क्रीडा प्रकारात नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवले आहे.