महिला नगरसेवकांचा महासभेत रौद्रावतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 01:28 AM2018-11-20T01:28:16+5:302018-11-20T01:28:39+5:30

अंगणवाडी सेविका, मदतनिसांवर कारवाई करत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांना घरचा रस्ता दाखविल्याने त्यांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप करत महासभेत सोमवारी (दि.१९) अंतिम टप्प्यात महिला नगरसेवकांनी आक्रमक होत रौद्रावतार धारण केला.

 Rowdavatar in the General Assembly of Women Councilors | महिला नगरसेवकांचा महासभेत रौद्रावतार

महिला नगरसेवकांचा महासभेत रौद्रावतार

Next

नाशिक : अंगणवाडी सेविका, मदतनिसांवर कारवाई करत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांना घरचा रस्ता दाखविल्याने त्यांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप करत महासभेत सोमवारी (दि.१९) अंतिम टप्प्यात महिला नगरसेवकांनी आक्रमक होत रौद्रावतार धारण केला. सभागृहातील सर्व महिला नगरसेवकांनी महापौरांच्या पीठावर जाऊन ठिय्या देत निदर्शने केली. यावेळी सभागृहातील पुरुष सदस्यांनी ‘नारी शक्तीचा विजय असो’, ‘नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी’ अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. यावेळी महापौरांनी अंगणवाडी सेविकांना तीन महिन्यांची संधी देण्याचे आदेश देत पुढचा विषय चर्चिला.
मनपा हद्दीतील निराधार, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित महिलांच्या मुलींच्या विवाहासाठी अर्थसहाय्य देणे, मुलांना शिष्यवृत्ती देणे, अनाथ मुलांना दत्तक घेतलेल्या पालकांना प्रोत्साहानात्मक अनुदान देणे आदींबाबत दोन कोटी रुपयांच्या निधी अथवा जास्त अर्ज आल्यास जादा खर्चासह योजनांची अंमलबजावणी कायमस्वरूपी करण्याबाबतचा महासभेच्या विषयपत्रिकेतील १३५ क्रमांकाचा विषय पटलावर आला. यावेळी नगरसेवक प्रियंका माने यांनी अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या उदरनिर्वाहाचे काय? असा प्रश्न उपस्थित करत त्यांना अंगणवाड्या सुरू होणार की नाही? असा प्रश्न मुंडे यांना विचारला. यावेळी त्यांनी मौन धारण केले. अवघ्या क्षणार्धात सभागृहातील सर्वच पक्षांच्या महिला सदस्यांनी जागा सोडून जोरदार घोषणाबाजी करत महापौरांच्या पीठासनाचा ताबा घेतला.
महापौरही आक्रमक
आंदोलनाची धार अधिक तीव्र झाली आणि सभागृह घोषणांनी दणाणून गेले. अखेर महापौर भानसी यांनीही आक्रमक होत तीन महिने संधी देण्याचे मान्य करत आदेश दिल्यानंतर पीठासनाचा ताबा महिला सदस्यांनी सोडला. या आंदोलनात नगरसेवक वत्सला खैरे, डॉ. हेमलता पाटील, प्रतिभा पवार, कल्पना पांडे, सत्यभामा गाडेकर, समीना मेमन, सुषमा पगारे, आशा तडवी, शाहिन मिर्झा, वर्षा भालेराव, स्वाती भामरे आदिंनी सहभाग घेतला.

Web Title:  Rowdavatar in the General Assembly of Women Councilors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.