शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
2
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
5
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
6
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
7
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
8
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
9
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
10
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
11
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
12
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
13
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
14
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
15
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
16
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
17
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
18
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
19
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
20
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
Daily Top 2Weekly Top 5

"रौलेट" म्होरक्या शहाच्या एजंटांभोवती आवळणार फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:57 IST

नाशिक : "रौलेट" नावाच्या ऑनलाइन मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे खेळल्या जाणाऱ्या जुगाराचा नाशिक जिल्ह्यातील मुख्य सूत्रधार संशयित कैलास शहा यास ग्रामीण पोलिसांनी अखेर बुधवारी रात्री अटक केली. जुगार खेळविण्यासाठी त्याच्याकडून वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक साधनांचा पोलिसांनी शोध घेत ती जप्त केली आहे.

ठळक मुद्देफरार संशयितांचा शोध सुरू : "रौलेट" हाताळणीची साधने जप्त

नाशिक : "रौलेट" नावाच्या ऑनलाइन मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे खेळल्या जाणाऱ्या जुगाराचा नाशिक जिल्ह्यातील मुख्य सूत्रधार संशयित कैलास शहा यास ग्रामीण पोलिसांनी अखेर बुधवारी रात्री अटक केली. जुगार खेळविण्यासाठी त्याच्याकडून वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक साधनांचा पोलिसांनी शोध घेत ती जप्त केली आहे.

या साधनांमधील माहितीची पडताळणी करून शहा याच्या स्थानिक एजंटभोवतीदेखील लवकरच फास आवळला जाणार असल्याची ग्वाही ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी गुरुवारी (दि.११) पत्रकार परिषदेत दिली.नाशकातील शहरी तसेच ग्रामीण भागात रौलेट नावाचा जुगार ऑनलाइन फोफावत असताना म्होरक्या पोलिसांच्या गळाला लागल्याने आता नाशिककरांचे लक्ष पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागले आहे. दरम्यान, गुरुवारी पाटील यांनी पत्रकार परिषद घेत या कारवाईप्रकरणी माहिती दिली. ते म्हणाले, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात मागील महिन्यात एका शेतकरी कुटुंबातील तरुणाने रौलेट जुगारात लाखो रुपये गमावल्याने विषारी औषध सेवन करत आत्महत्या केली होती. संदीप दिलीप मेढे (२७, रा.आंबोली) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील दिलीप नामदेव मेढे (५१) यांनी याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत संशयित कैलास शहा याच्याकडून होणारा त्रास अन‌् त्याच्या साथीदारांकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांनी त्रस्त होत संदीप याने जीवन संपविल्याचे म्हटले. या फिर्यादीनुसार पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शहा याच्यासह दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात संशयित शहा याच्यासह शांताराम पगार, सुरेश अर्जुन वाघ हे तिघेही फरार होते. पोलीस त्यांच्या मागावर होते. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहा यास शिताफीने बुधवारी सापळा रचुून ताब्यात घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. त्याचे उर्वरित दोघे फरार साथीदार पगार व वाघ यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. त्यांनाही लवकरच अटक करण्यास यश येईल, असा आशावाद अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी यावेळी व्यक्त केला."रौलेट"ची पाळेमुळे नष्ट होणार?नाशिक जिल्ह्यात रौलेट या ऑनलाइन जुगाराचे बीज पेरून अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ऑनलाइन जुगार गेमचा म्होरक्या पोलिसांच्या हाती लागला आहे. यामुळे आता या जुगाराची पाळेमुळे उखडून फेकण्यास पोलिसांना कितपत यश येते, हे नजीकच्या काळात दिसून येईल. या गुन्ह्यातील सर्व संशयितांविरुध्द कारवाई केली जाणार असल्याचे सचिन पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात रौलेट जुगाराविषयी जर कोणाची तक्रार असेल तर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्यावी, असेही आवाहन पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी