शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पालखेड डाव्या कालव्यातून आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 01:58 IST

वागदर्डी धरण कोरडेठाक पडल्यामुळे निर्माण झालेल्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालखेड डाव्या कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे ४८० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आल्यामुळे मनमाडसह अन्य गावांना येत्या दोन दिवसांत पाणी पोहोचणार आहे. रविवारी सोडण्यात आलेले पाणी उद्यापर्यंत धरणात पोहोचणार असल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

नाशिक : वागदर्डी धरण कोरडेठाक पडल्यामुळे निर्माण झालेल्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालखेड डाव्या कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे ४८० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आल्यामुळे मनमाडसह अन्य गावांना येत्या दोन दिवसांत पाणी पोहोचणार आहे. रविवारी सोडण्यात आलेले पाणी उद्यापर्यंत धरणात पोहोचणार असल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण संपूर्णपणे कोरठेठाक पडल्याने या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मनमाड मुख्याधिकाऱ्यांनी पाणी नियोजन वेळेत न केल्याप्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीचे नियोजन करून पालखेड डाव्या कालव्याद्वारे पाण्याचे आवर्तन सोडण्यास मान्यता दिल्यानंतर आता पालखेडमधून पाणी सोडण्यात आले आहे. पालखेड धरणातून लाभक्षेत्रातील बिगर सिंचनासाठी मनमाड नगरपरिषद, मनमाड रेल्वे, येवला नगरपरिषद, येवला तालुक्यातील ३८ गावे पाणीपुरवठा योजना विंचूर, लासलगाव, आंगेगाव या संस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून ४८० दलघफू पाणी दि. २ ते १० जून या कालावधीत आवर्तन सोडण्यात आले आहे. आवर्तन कालावधीत पाण्याची चोरी होऊ नये यासाठी विशेष दक्षतादेखील घेण्यात आली आह े.आवर्तन सोडण्याच्या कालावधीत २२ तास वीजबंदी करण्यात आली असून, फक्त सकाळी २ तास वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात येणार आहे. पाण्याचा अनधिकृत उपसा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनादेखील जिल्हाधिकाºयांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. दरम्यान, सर्व पाणीवापर संस्थांना पाणी पोहोच करण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची असल्यामुळे तशा सूचना संबंधिताना देण्यात आल्या असून, पाटबंधारे विभागानेदेखील अनधिकृत पाणी ओढणाºयांवर कारवाई केलेली आहे.दोन हजार डोंगळे उद्ध्वस्तपालखेड डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने पाण्याची चोरी होऊ नये म्हणून पालखेडमधून पाण्याचा विसर्ग करण्यापूर्वी कालव्यातील सुमारे दोन हजार डोंगळे उद्ध्वस्त करण्यात आले. कालव्यातील जमिनीखालून पाईप टाकून पाण्याची चोरी केली जाते. सदर पाईप काढून ते जप्त करण्यात आले आहेत.

टॅग्स :DamधरणWaterपाणी