रोटरीमार्फत सर्जिकल इक्विपमेंट अर्थो बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST2021-07-19T04:11:10+5:302021-07-19T04:11:10+5:30

येथील लाडशाखीय वाणी मंगल कार्यालयात रोटरी क्लब ऑफ सटाणा मिडटाऊन व इनरव्हिल क्लबच्या पदग्रहण सोहळ्यात पदभार स्वीकारल्यानंतर पाटील ...

Rotary Surgical Equipment Earth Bank | रोटरीमार्फत सर्जिकल इक्विपमेंट अर्थो बँक

रोटरीमार्फत सर्जिकल इक्विपमेंट अर्थो बँक

येथील लाडशाखीय वाणी मंगल कार्यालयात रोटरी क्लब ऑफ सटाणा मिडटाऊन व इनरव्हिल क्लबच्या पदग्रहण सोहळ्यात पदभार स्वीकारल्यानंतर पाटील बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दिलीप बोरसे, रोटरीचे उपप्रांतपाल दिलीप ठाकरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, नगराध्यक्ष सुनील मोरे आदी उपस्थित होते. शहर व तालुक्यातील गरजू रुग्णांची गैरसोय लक्षात घेता, (स्व.) निंबा अमृतकर व (स्व.) साखरचंद राका यांच्या स्मरणार्थ सर्जिकल इक्विपमेंट अर्थो बॅंक सुरू करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमास यशवंत अमृतकार. सचिन दशपुते, नवल मोरे, नीलेश धोंडगे, नितीन बागड, रामदास पाटील, शांताराम गुंजाळ, राहुल जाधव, अमोल अंधारे, रामकृष्ण शेवाळे, परेश कोठावदे, रूपाली कोठावदे, नयना कोठावदे, ॲड. सरोज चंद्रात्रे, ॲड. रवींद्र पाटील, श्रीधर कोठावदे, सुरेश बागड, राजेंद्र भांगडीया, मनोज पिंगळे, किशोर कदम, ॲड.हिरामण सोनवणे, ॲड. संजय सोनवणे आदींसह नागरिक उपस्थित होते.

यशवंत अमृतकार यांनी प्रास्ताविक केले, तर तुषार महाजन यांनी सूत्रसंचालन केले. सचिव प्रकाश सोनग्रा यांनी आभार मानले.

इन्फो

पदग्रहण सोहळा

मावळत्या अध्यक्षा विद्द्या अमृतकार यांनी नूतन अध्यक्ष अभिमन्यू पाटील यांना पद्‌भार दिला, तर प्रकाश सोनग्रा यांनी नूतन सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. इनरव्हील क्लबच्या मावळत्या अध्यक्षा रूपाली जाधव यांनी नूतन अध्यक्षा साधना पाटील यांना पदभार दिला, तर रेखा वाघ यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. सौ. अमृतकार यांनी गेल्या वर्षभरातील कामकाजाची माहिती दिली. नामको बँकेचे संचालक महेंद्र बुरड व आदर्श शिक्षक तुषार महाजन यांचा गौरव करण्यात आला.

फोटो- १८ रोटरी सर्जिकल

सटाणा रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनच्या अध्यक्षपदाचा पदभार ॲड. अभिमन्यू पाटील यांच्याकडे सुपूर्द करताना विद्द्‌या अमृतकार.

180721\18nsk_24_18072021_13.jpg

फोटो- १८ रोटरी सर्जिकल सटाणा रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनच्या अध्यक्षपदाचा पदभार ॲड. अभिमन्यू पाटील यांच्याकडे सुपूर्द करताना विद्या अमृतकार. 

Web Title: Rotary Surgical Equipment Earth Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.