रोटरी क्लबतर्फे चित्रकला स्पर्धा
By Admin | Updated: June 1, 2016 23:09 IST2016-06-01T22:55:21+5:302016-06-01T23:09:54+5:30
रोटरी क्लबतर्फे चित्रकला स्पर्धा

रोटरी क्लबतर्फे चित्रकला स्पर्धा
नाशिकरोड : रोटरी क्लब आॅफ नाशिक एअरपोर्ट व सुराणा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली.
‘पाणी वाचवा’ या संकल्पनेवर आधारित तीन वयोगटात झालेल्या स्पर्धेत १६० मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. ३-६ वयोगटात प्रथम- अचिरा जैन, द्वितीय- यतिका भुतडा, तृतीय- प्रीती सिनकर, ६ ते १० वयोगट- प्रथम- आर्या झगडे, द्वितीय- हिमानी बेदमुथा, तृतीय- दक्ष कोल्हे, १० ते १५ वयोगट प्रथम- राहुल सोनवणे, द्वितीय- गायत्री काळे, तृतीय- नूपुर बर्वे आदिंसह उत्तेजनार्थ पारितोषिक नगरसेवक रमेश धोंगडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून कविता झगडे, कृष्णा राठी यांनी काम पाहिले.
यावेळी डॉ. नितीन सुराणा, डॉ. ममता सुराणा, रोटरीचे अध्यक्ष प्रीतेश शाह, अभिजित जोपूळकर, गौरांग ओझा, चेतन सोनकुळे, भारती जाधव आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)