रोटरी क्लब गोदावरीतर्फे महिलांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST2021-07-19T04:11:52+5:302021-07-19T04:11:52+5:30

आशा वेणुगोपाल आणि वना ठक्कर यांच्या हस्ते वीस महिलांना बिनव्याजी आठ हजारांपर्यंतचे धनादेश वितरित करण्यात आले. पुढील वर्षापर्यंत ...

Rotary Club Godavari helps women | रोटरी क्लब गोदावरीतर्फे महिलांना मदत

रोटरी क्लब गोदावरीतर्फे महिलांना मदत

आशा वेणुगोपाल आणि वना ठक्कर यांच्या हस्ते वीस महिलांना बिनव्याजी आठ हजारांपर्यंतचे धनादेश वितरित करण्यात आले. पुढील वर्षापर्यंत सुमारे शंभर महिलांना अशी मदत करण्याचे क्लबचे लक्ष्य असल्याचे सांगण्यात आले. ही रक्कम या महिलांनी स्वयंरोजगारासाठी भांडवल म्हणून वापरायची आहे. यामध्ये टेलरिंग, खानावळ, ब्युटी पार्लर, मेहंदीकोन इत्यादी स्वरोजगार उद्योग यातून या महिला सुरू करू शकतात. हेमलता सिंघल, अमोल कलंत्री, ओंकार महाले, आरती पाटील, मेघना नाथे, रोहित सागोरे, डॉ प्रतिभा बोरसे, डॉ. प्रणीता गुजराथी, हेमंत पमनानी, किरण सागोरे यांनी एकत्र येत निधीसाठी योगदान दिले. डॉ मेघना नाथे यांनी सूत्रसंचालन केले. सचिव डॉ. संगीता लोढा यांनी आभार मानले.

Web Title: Rotary Club Godavari helps women