अध्यक्षपदी रौंदळ, देवरे उपाध्यक्ष

By Admin | Updated: August 10, 2015 23:00 IST2015-08-10T22:56:00+5:302015-08-10T23:00:43+5:30

मजूर संघ : किमान एक वर्षाचा कालावधी मिळण्याची शक्यता

Rondal as President, Deore vice president | अध्यक्षपदी रौंदळ, देवरे उपाध्यक्ष

अध्यक्षपदी रौंदळ, देवरे उपाध्यक्ष

नाशिक : जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघाच्या अध्यक्षपदी शिवाजी रौंदळ व उपाध्यक्षपदी संगीता रवींद्र देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तूर्तास ही निवड नेमकी किती कार्यकाळासाठी हे स्पष्ट नसले तरी नूतन पदाधिकाऱ्यांना किमान वर्षभरासाठी कामकाज करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
काल (दि,१०) सायंकाळी ५ वाजता जिल्हा मजूर संघाच्या श्रम सहकार कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तालुका उपनिबंधक गोपाळ मावळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. अध्यक्ष पदासाठी शिवाजी रौंदळ यांनी, तर उपाध्यक्ष पदासाठी संगीता रवींद्र देवरे यांनी उमेदवारी अर्ज नेऊन वेळेत दाखल केले. शिवाजी रौंदळ यांच्या उमेदवारी अर्जासाठी सूचक संपतराव सकाळे, तर अनुमोदन केदा अहेर होते. तर संगीता देवरे यांच्या उमेदवारी अर्जास सूचक म्हणून दिलीप पाटील, तर अनुमोदक म्हणून आनंदा चौधरी होते. दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज दाखल झालेले असल्याने मतदान घेण्याची वेळ न येताच निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांनी जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्ष पदी शिवाजी रौंदळ यांची, तर उपाध्यक्ष पदी संगीता रवींद्र देवरे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी बैठकीस जिल्हा मजूर संघाचे संचालक जि. प. सभापती केदा अहेर, जिल्हा बॅँकेचे माजी संचालक राजेंद्र भोसले, जि. प. सदस्य संपतराव सकाळे, दिलीप पाटील, दिनकर उगले, संजय चव्हाण, राजाराम खेमनार, योगेश हिरे, गोरख शिंदे, म्हसू कापसे, योजना अहेर, अरुण गायकर, प्रमोद मुळाणे, संजय नाठे, शरद काळे, चंद्रलेखा मुरलीधर जाधव, योगेश पगार, आनंदा चौधरी, गणपत चौधरी आदि उपस्थित
होते.
यावेळी मजूर संघाच्या कार्यालयात मविप्र संचालक व जि. प. सदस्य रवींद्र देवरे, संजय बलकवडे, संदीप थेटे, प्रकाश शिंदे, महेश भामरे, मुरलीधर जाधव, दिलीप गायकवाड, विष्णुकांत गिते, रमेश पाटील, शांताराम मुळाणे, सागर सोनवणे, सचिव सुनील वारुंगसे, संजय बडवर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Rondal as President, Deore vice president