नागझरा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन
By Admin | Updated: June 3, 2014 01:44 IST2014-06-02T22:03:30+5:302014-06-03T01:44:17+5:30
सुरगाणा : तालुका शिवसेनेच्या वतीने वणी-बोरगाव-सापुतारा राज्य महामार्गावर मंगळवारी (दि. ३) साडेदहा वाजता नागझरी फाटा येथे विविध मागण्यांसंदर्भात पाठपुरावा करणेसाठी रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती तालुका शिवसेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष मोहन गांगुर्डे यांनी दिली.

नागझरा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन
सुरगाणा : तालुका शिवसेनेच्या वतीने वणी-बोरगाव-सापुतारा राज्य महामार्गावर मंगळवारी (दि. ३) साडेदहा वाजता नागझरी फाटा येथे विविध मागण्यांसंदर्भात पाठपुरावा करणेसाठी रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती तालुका शिवसेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष मोहन गांगुर्डे यांनी दिली.
या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील शासन पुरस्कृत विकासकामांची नोकरशाहीकडून होणारी हेळसांड निषेधार्ह असून, तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला भेडसावणार्या विविध प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. टंचाईग्रस्त गावांना टॅँकरने पाणीपुरवठा करणे, रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे, अवकाळी पावसाने, चक्रीवादळाने नुकसानग्रस्तांना भरपाई द्या आदि मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात येणार आहे.(वार्ताहर)