रोकडोबा पाराचा आजपासून जीर्णोद्धार

By Admin | Updated: May 24, 2014 00:22 IST2014-05-24T00:20:30+5:302014-05-24T00:22:01+5:30

नाशिक : महाराष्ट्रातील अनेक थोर पुरुषांचे वास्तव्य लाभलेल्या गंगेच्या घाटावरील अतिप्राचीन रोकडोबा पाराचा जीर्णोद्धार सोहळा शनिवार (दि.२४) पासून सुरू होत आहे. त्यानिमित्त २४ व २५ असे दोन दिवस प्राणप्रतिष्ठा, होमहवन, कलश पूजन, अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तपोनिधी पंचायती आखाड्याचे महंत तथा आखाडा षडदर्शन परिषद, त्र्यंबकेश्वराचे प्रमुख सागरानंद सरस्वती यांच्या हस्ते या पाराचा जीर्णोद्धार सोहळा होणार असून, वेदमूर्ती अविनाश देव (धर्माधिकारी) आचार्य म्हणून काम करीत आहे.

Rokdoba mercury renovated today | रोकडोबा पाराचा आजपासून जीर्णोद्धार

रोकडोबा पाराचा आजपासून जीर्णोद्धार

नाशिक : महाराष्ट्रातील अनेक थोर पुरुषांचे वास्तव्य लाभलेल्या गंगेच्या घाटावरील अतिप्राचीन रोकडोबा पाराचा जीर्णोद्धार सोहळा शनिवार (दि.२४) पासून सुरू होत आहे. त्यानिमित्त २४ व २५ असे दोन दिवस प्राणप्रतिष्ठा, होमहवन, कलश पूजन, अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तपोनिधी पंचायती आखाड्याचे महंत तथा आखाडा षडदर्शन परिषद, त्र्यंबकेश्वराचे प्रमुख सागरानंद सरस्वती यांच्या हस्ते या पाराचा जीर्णोद्धार सोहळा होणार असून, वेदमूर्ती अविनाश देव (धर्माधिकारी) आचार्य म्हणून काम करीत आहे.
नाशिकचे ग्रामदैवत मोदकेश्वर आणि रोकडोबा हनुमान यांच्यात मधोमध असलेला पार अनेक घटना घडामोडींचा साक्षीदार आहे. गजानन महाराज, साईबाबा, गोपालदास महाराज, संत गाडगे महाराज अशा अनेक विभुतींचे पारावर वास्तव्य असायचे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे तर रोकडोबा यात्रेत प्रवचन होत आणि बोहाडा सारखे कार्यक्रमही व्हायचे अशा या पाराच्या जीर्णोद्धार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन रोकडोबा मित्रमंडळाचे अध्यक्ष शाहू खैरे यांनी केले आहे.

Web Title: Rokdoba mercury renovated today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.