शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बचतगटाच्या महिलांना ‘रोहयो’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 00:19 IST

कोरोनामुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पुरती कोलमडून पडली असून, खेड्यापाड्यात राहणाऱ्या शेतमजुरांच्याही हाताला काम राहिलेले नसल्याने हाता-तोंडाची गाठ कशी बांधावी, असा प्रश्न निर्माण झालेला असताना जिल्हा परिषदेने महिला बचतगटांना महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या कामात येवला तालुक्याने मोठी मजल मारली असून, सहा ग्रामपंचायतींनी बचत गटातील जवळपास दोनशे ते तीनशे महिलांच्या हाताला गेल्या काही दिवसांपासून काम दिले आहे.

ठळक मुद्देशेकडो हातांना काम : राज्यात नाशिक पॅटर्न चर्चेत

नाशिक : कोरोनामुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पुरती कोलमडून पडली असून, खेड्यापाड्यात राहणाऱ्या शेतमजुरांच्याही हाताला काम राहिलेले नसल्याने हाता-तोंडाची गाठ कशी बांधावी, असा प्रश्न निर्माण झालेला असताना जिल्हा परिषदेने महिला बचतगटांना महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या कामात येवला तालुक्याने मोठी मजल मारली असून, सहा ग्रामपंचायतींनी बचत गटातील जवळपास दोनशे ते तीनशे महिलांच्या हाताला गेल्या काही दिवसांपासून काम दिले आहे.कोरोनाचा फटका गावोगावच्या महिला बचतगटांनाही बसला असून, त्यांच्याकरवी तयार केल्या जात असलेल्या गृहोपयोगी वस्तूंनाही मागणी नसल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत बचत गटाच्या महिलांना आठवड्याकाठी भरावे लागणारे बचत गटाचे शुल्क कोठून आणावे? असा प्रश्न निर्माण झाला असून, काही महिलांनी बचतगटांकडून कर्ज घेतलेले असल्याने त्यांनाही कर्ज फेडायची चिंता वाटू लागली आहे. या सर्व बाबींची विचार करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजना व महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाची सांगड घालून महिलांना बचत गटांच्या माध्यमातून रोहयोचे काम उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तशा सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आल्याने त्याची सुरुवात येवला तालुक्यापासून करण्यात आली आहे.गावोगावच्या ग्रामपंचायतींनी आपल्या गावातील महिला बचत गटांना या योजनेविषयी अवगत केल्यानंतर येवला तालुक्यातील पाटोदा, शिरसगाव लौकी, पारेगाव, चिंचोडी, रायते, अंगुलगाव, नांदूर या गावातील बचत गटातील महिलांना रोहयोच्या कामासाठी पुढाकार दर्शवून आपल्या बचतगटाची नोंद ग्रामपंचायतीच्या कामासाठी केली आहे. सध्या या सहाही गावामध्ये रोहयोच्या समूह गटाच्या कामासाठी महिला बचत गटाने सुरुवात केली असून, गावातील तलावाचे काम काढण्याचे अकुशल कामे त्यांच्याकडून करवून घेतली जात आहेत.या कामासाठी दररोज या महिलांसाठी गाळ काढण्यासाठीचे मार्किंग करून दिले जात असून, दिवसभरातून त्यांनी किती कामकाज केले त्याचे सायंकाळी मोजमाप केले जाते. त्या कामाच्या प्रमाणात त्यांना त्याचा मेहनताना अदा केला जात आहे.रोहयोच्या कामासाठी प्रत्येकी २२७ रुपये मेहनताना शासनाने निश्चित केलेला असला तरी, महिलांच्या कार्यक्षमतेवर त्यापेक्षाही अधिक शुल्काचे काम करून महिलांकडून तीनशे ते चारशे रुपयांचे काम केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जात असलेल्या या कामासाठी सुरक्षित अंतर ठेवण्याचे, तोंडाला मास्क वापरण्याचे त्याचबरोबर काम आटोपल्यानंतर हात स्वच्छ धुण्याची व्यवस्थाही केली जात आहे.जॉबकार्ड तयार करण्याचे काम सुरूग्रामीण भागातील महिलांना रोहयोतून काम मिळू लागल्याचे पाहून येवला तालुक्यातील महिला बचतगटाच्या सुमारे चारशे ते पाचशे महिलांनी रोहयोच्या कामासाठी आपली नोंदणी केली असून, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून त्यांचे जॉबकार्ड तयार करण्याचे काम केले जात असल्याची माहिती तालुका समन्वयक दीपिका जैन यांनी दिली आहे, तर महिला बचतगटातील महिलांना अधिकाधिक कामे देण्यासाठी गटविकास अधिकारी उमेश देशमुख प्रयत्नशील आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या