जिल्ह्यात रोहिणी बरसल्या

By Admin | Updated: June 2, 2017 02:09 IST2017-06-02T02:09:13+5:302017-06-02T02:09:32+5:30

गुरुवारी सायंकाळी शहर व जिल्ह्यात रोहिणी बरसल्या. विजांच्या कडकडाटासह जिल्ह्णात वरुणराजाने जोरदार सलामी दिली.

Rohini lived in the district | जिल्ह्यात रोहिणी बरसल्या

जिल्ह्यात रोहिणी बरसल्या

 लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मान्सूनच्या आगमनाची चातकासारखी वाट पाहिली जात असतानाच गुरुवारी सायंकाळी शहर व जिल्ह्यात रोहिणी बरसल्या. विजांच्या कडकडाटासह जिल्ह्णात वरुणराजाने जोरदार सलामी दिली.
दरम्यान, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वायघोळपाडा येथे सोनीबाई पुंडलिक आंबेकर (वय ४५) व अरुण पुंडलिक आंबेकर (वय २१) या दोघांचा सायंकाळच्या सुमारास वीज पडून जागीच मृत्यू झाला.
गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्णात ढगाळ वातावरण होते. गुरुवारी दिवसभर मात्र वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. दुपारनंतर निफाड, सिन्नर तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाने जोरदार सलामी दिली. इगतपुरी,त्र्यंबकेश्वरसह अन्यत्रही पावसाची हजेरी होती. सायंकाळी सहाच्या सुमारास शहरात विजेच्या कडकडाटांसह पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने सायंकाळी चाकरमान्यांची चांगलीच तांराबळ उडाल्याचे चित्र होते.

Web Title: Rohini lived in the district