शहरातील एटीएममध्ये खडखडाट

By Admin | Updated: May 9, 2017 17:04 IST2017-05-09T17:04:20+5:302017-05-09T17:04:20+5:30

वेतनदारांचे हाल : खात्यावर शिल्लक असूनही पैसे मिळत नसल्याने नाशिककरांमध्ये संताप

Rocks at the city's ATM | शहरातील एटीएममध्ये खडखडाट

शहरातील एटीएममध्ये खडखडाट

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गेल्या महिनाभरापासून नाशिकमधील बहुतांश सरकारी तसेच खासगी बँकांच्या अनेक एटीएममध्ये खडखडाट असल्याचे समोर येत आहे. त्यातच सध्या १ ते १० तारखेपर्यंत पगाराचे दिवस असताना खात्यात पैसे असूनही ते हातात मिळत नाहीत़ त्यामुळे नोकरदार वर्गासह सर्वच ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत़
तांत्रिक कारणामुळे शहरातील बहुतांश बँकांचे एटीएम बंद असल्याचे अधिकारी सांगत आहेत, परंतु बँकांनी रोख व्यवहारांवर अटी- शर्ती लागू केल्यामुळे बँकेतून रोख रक्कम काढून स्वत:जवळ बाळगण्याकडे ग्राहकांचा कल वाढू लागल्याने बँकांमध्ये नोटांचा तुटवडा जाणवू लागल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. शहरात ५० टक्क्यांहून अधिक एटीएम रिकामे असल्याने पैसे मिळणाऱ्या एटीएमबाहेर थांबून पैसे काढण्याला नागरिक प्राधान्य देत आहेत. एटीएममध्ये रक्कम असल्याचे समजताच अनेकजण थांबून पैसे काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. नोव्हेंबर-डिसेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीच्या काळात बँकांबाहेर रांगा लागला होत्या, त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये, यासाठी बँकांकडून रिझर्व्ह बँके कडे अधिक चलन पुरवठा करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Rocks at the city's ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.