दुचाकीस्वाराची लूटमार; दोन मोबाइल पळविले

By Admin | Updated: July 3, 2015 00:05 IST2015-07-03T00:05:53+5:302015-07-03T00:05:53+5:30

दुचाकीस्वाराची लूटमार; दोन मोबाइल पळविले

Robbery of two-wheelers; Two mobiles ran | दुचाकीस्वाराची लूटमार; दोन मोबाइल पळविले

दुचाकीस्वाराची लूटमार; दोन मोबाइल पळविले

नाशिक : नादुरुस्त झालेली दुचाकी दुरुस्त करीत असलेल्या खुटवडनगर येथील दोेघा दुचाकीस्वारांना तीन अनोळखी इसमांनी मारहाण करून त्यांच्याकडील दोन मोबाइल चोेरून नेल्याची घटना कॉलेजरोडवरील सिद्धार्थनगर झोपडपट्टीजवळ बुधवारी सायंकाळी घडली.
सत्यराम माधव यादव (रा. सिडको) हा जोडीदार मोतीलाल यादव यांच्यासह खुटवडनगर येथे दुचाकीने कॉलेजरोडकडून खुटवडनगर येथे जात असताना सिद्धार्थनगर झोपडपट्टीजवळ त्यांचे वाहन बंद पडले. ते वाहन दुरुस्त करीत असताना तिघा अनोळखी इसमांनी त्यांना लोखंडी रॉडने मारून त्यांच्याजवळील ३२०० रुपये किमतीचे दोन मोबाइल चोरून नेले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Robbery of two-wheelers; Two mobiles ran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.