रिक्षातून घेऊन जात युवकास लुटले

By Admin | Updated: October 12, 2015 22:21 IST2015-10-12T22:20:36+5:302015-10-12T22:21:23+5:30

रिक्षातून घेऊन जात युवकास लुटले

The robbery took away from the rickshaw | रिक्षातून घेऊन जात युवकास लुटले

रिक्षातून घेऊन जात युवकास लुटले

नाशिक : घरफोडी, चोरी, चेनस्रॅचिंग यापाठोपाठ शहरात आता दिवसाढवळ्या लुटीच्या घटना घडू लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे़ रविवार कारंजावरून रिक्षात बसवून फुलेनगरला नेऊन राणेनगरमधील युवकास लुटल्याची घटना रविवारी (दि़११) दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, मूळचा सटाणा येथील मात्र सद्यस्थितीत राणेनगर येथे राहणारा शुभम दिलीप वाघ (२०) हा युवक दुपारी बारा वाजेच्या सुमारास रविवार कारंजा येथे उभा होता़ त्यास संशयितांनी रिक्षामध्ये (एमएच १५, झेड ६५६७) बसवून पेठरोडमार्गे फुलेनगर येथे घेऊन गेले़
या ठिकाणी मारहाण, दमदाटी करून त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी, हातातील चांदीचे ब्रेसलेट, दोन मोबाइल व रोख रक्कम असा ३८ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने काढून घेतला़
या प्रकरणी शुभम वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांनी जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The robbery took away from the rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.