अंबड लिंकरोडवर टेम्पोचालकाची लूट
By Admin | Updated: May 7, 2014 22:29 IST2014-05-07T21:49:38+5:302014-05-07T22:29:36+5:30
नाशिक : इगतपुरी येथील टेम्पोचालकाची दुचाकीवर आलेल्या तिघांनी लूट केल्याची घटना बुधवारी रात्री घडली़.

अंबड लिंकरोडवर टेम्पोचालकाची लूट
नाशिक : इगतपुरी येथील टेम्पोचालकाची दुचाकीवर आलेल्या तिघांनी लूट केल्याची घटना बुधवारी रात्री घडली़ संजय विष्णू आंडे हे बुधवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास अंबड लिंकरोडवरील हॉटेल संगमजवळ टेम्पोतील डिझेल संपल्याने उभे होते़ यावेळी दुचाकीवर आलेले संशयित संतोष दामोदर खांडेकर (रा़ संस्कृती अपार्टमेंट), अशोक सहादू सोडनार (रा़ चुंचाळे गाव), लखन मंगेश काळे (रा़जाधव संकुल, अंबड) हे तिघे दुचाकीवर आले़ त्यांनी टेम्पोच्या क्लिनरला मारहाण करीत त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाइल लुटून नेला़ या प्रकरणी आंडे यांनी दिलेल्या फि र्यादीवरून या तिघांविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे़(प्रतिनिधी)