दरोडयाच्या तयारीतील टोळी जेरबंद

By Admin | Updated: May 31, 2014 02:05 IST2014-05-31T00:14:35+5:302014-05-31T02:05:49+5:30

दत्तनगर येथिल घटना : रिक्षासह शस्त्रास्त्रे जप्त

Robbery preparing gangs for the robbery | दरोडयाच्या तयारीतील टोळी जेरबंद

दरोडयाच्या तयारीतील टोळी जेरबंद

दत्तनगर येथिल घटना : रिक्षासह शस्त्रास्त्रे जप्त

पंचवटी : पेठरोडवरील दत्तनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमाराला दरोडा टाकण्याच्या इराद्याने फिरणार्‍या टोळीचा पंचवटी गुन्हा शोध शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असुन त्यांच्याकडून धारदार तलवार, दोरी तसेच रिक्षा असा हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीसांनी शनिमंदीर येथिल दिपक कापुरे, राहूल पगारे, दिंडोरीरोडवरील राजेंद्र सोनवणे, व बोरगड येथे राहणारा अशोक भालेराव अशा चौघांना अटक केली आहे. शुक्रवारी पहाटे पावणेतीन वाजता पंचवटी गुन्हा शोध पथकाचे पोलीस कर्मचारी दत्तनगर विटभ˜ीजवळ गस्त घालत असतांना रिक्षा क्रमांक (एम. एच. १५ झेड ९७५९) ही संशयास्पद रित्या उभी होती. पोलीसांनी रिक्षात बसलेल्या चौघांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व त्यातील दोघा जणांनी पळ काढला. पोलीसांचा संशय बळावल्याने त्यांचा पाठलाग करून पकडले व रिक्षाची झडती घेतली असता रिक्षात दोरी तसेच धारदार तलवार मिळून आली पोलीसांनी लागलीच चौघांनाही पोलीस ठाण्यात आणून कसुन चौकशी केली असता त्यांनी दरोडा टाकण्याच्या इराद्याने दत्तनगर भागात थांबलेले असल्याची कबुली दिल्याचे पोलीसांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार विजय गवांदे, भगिरथ नाईक, येवाजी महाले, विजय वरंदळ, कोकाटे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Robbery preparing gangs for the robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.