शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंपावर दरोडा; तीन जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 00:29 IST

नांदुरी-वणी रस्त्यावरील ओम साई पेट्रोलपंपावर शनिवारी (दि. १८) रात्री चार दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्यानंतर झालेल्या झटापटीत जमावाच्या मारहाणीत एका संशयिताचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देझटापटीत एकाचा मृत्यू : परस्परविरोधी तक्रार

कळवण : नांदुरी-वणी रस्त्यावरील ओम साई पेट्रोलपंपावर शनिवारी (दि. १८) रात्री चार दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्यानंतर झालेल्या झटापटीत जमावाच्या मारहाणीत एका संशयिताचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.नांदुरी शिवारातील पेट्रोलपंपावर शनिवारी (दि. १८) रात्री ९ वाजेच्या सुमारास दुचाकीवर चार जण तोंडाला रु माल बांधून आले. त्यांनी कोयत्याने केबिनच्या काचा फोडत रेवण जोपळे व रवींद्र जोपळे यांना मारहाण केली. घाबरलेले पंपमालक किशोर सूर्यवंशी यांनी पैसे घ्या; पण मारू नका अशी विनंती करून चार तोळे वजनाची सोन्याची चेन, हातातील पाच तोळे वजनाचे ब्रेसलेट, भ्रमणध्वनी असा दोन लाखांचा ऐवज संशयितांना देत पळ काढला. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या मजुरांनी दरोडेखोरांना पकडले. मोटारसायकल बंद पडल्यामुळे दोन संशयित सापडले तर दोन जण फरार झाले. त्यांना पकडण्यासाठी परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. वणी रस्त्यावर यातील एक जण सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली. चौथ्या दरोडेखोरास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी झालेल्या झटापटीत दरोडेखोरांना अज्ञात नागरिकांकडून जबर मारहाण झाली. रुग्णालयात दाखल केलेल्या संशयित तेजस सूर्यवंशी यास मृत घोषित करण्यात आले. इतर संशयितांपैकी कृष्णा महेंद्र बडगुजर यास नाशिक येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. एकावर कळवण येथे उपचार सुरू आहेत.झटापटीत तेजस सूर्यवंशी याचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी जमाविरु द्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मयत तेजस सूर्यवंशी, रा. निरपूर ता. सटाणा, रोहित सीताराम घोडे रा. बंधारपाडा ता. सटाणा, कृष्णा महेंद्र बडगुजर व गणेश रमेश बग्गन, रा. आरटीओ कॉर्नर, नाशिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय संशयितांनीही तक्रार नोंदविल्याने परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़१४ जुलै रोजी तिसगाव शिवारातील साई गजानन पेट्रोलपंपावरचार अज्ञात संशियतांनी कर्मचाऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवत सोळा हजार पाचशे रु पये घेवून पळ काढल्याची घटना घडली होती. यातील दरोड्याची व शनिवारी रात्री नांदुरी लुटीची पद्धत सारखी असल्याचा पोलिसांना संशय आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी