बनावट बंदुकीचा धाक दाखवून लूट

By Admin | Updated: June 19, 2014 00:52 IST2014-06-19T00:50:08+5:302014-06-19T00:52:02+5:30

नाशिक : बनावट बंदुकीचा धाक दाखवून लूट

Robbery with fake firearms | बनावट बंदुकीचा धाक दाखवून लूट

बनावट बंदुकीचा धाक दाखवून लूट

नाशिक : बनावट बंदुकीचा धाक दाखवून दुकानदाराच्या गल्ल्यातील रोख रक्कम लुटणाऱ्या उपेंद्र रावत व फारूक शेख या दोघा संशयितांना नागरिक आणि पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले़ या दोघांनाही अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर आडगाव पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सुधाकर अंबादास पेखळे यांच्या माडसांगवीतील दुकानात संशयित उपेंद्र गणेश रावत (२९, कामटवाडे, सिडको) व फारुख शब्बीर शेख (२८, शिवाजीनगर, सातपूर) हे दोघे तरुण दुचाकीवर आले़ त्यांनी पेखळे यांना बंदुकीचा धाक दाखवून पैशांची मागणी केली़ पेखळे यांनी गल्ल्यातील एक हजार २०० रुपये काढून दिले़ यानंतर या दोघांनीही दुचाकीवरून नाशिककडे पलायन केले़
नागरिकांनी व आडगाव पोलिसांनी या दोघांचा पाठलाग करून औरंगाबाद नाक्यावरील जनार्दन स्वामी मठाच्या पुलावर संशयित उपेंद्र रावत यास पकडले़ यानंतर त्याचा साथीदार फारूक शेख यासही अटक करण्यात आली़ (प्रतिनिधी)

Web Title: Robbery with fake firearms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.