देवठाण येथे दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:18 IST2021-07-07T04:18:30+5:302021-07-07T04:18:30+5:30

येवला : तालुक्यातील देवठाण येथील खिल्लारे वस्तीवर सोमवारी मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून २२ हजाराची लूट केली, तर दरोडेखोरांनी ...

Robbery at Deothan | देवठाण येथे दरोडा

देवठाण येथे दरोडा

येवला : तालुक्यातील देवठाण येथील खिल्लारे वस्तीवर सोमवारी मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून २२ हजाराची लूट केली, तर दरोडेखोरांनी घरातील वृद्धास मारहाण केली आहे. खिल्लारे वस्ती येथे कारभारी खिल्लारे यांचे घरावर अज्ञात दरोडेखोरानी दरोडा टाकला. घरातून पाच हजार रोख रकमेसह आठ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण २२ हजार रुपयांची लूट केली. यावेळी प्रतिकार करणारे वृद्ध कारभारी सुखदेव खिल्लारे यांच्यावर दरोडेखोरांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात खिल्लारे जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड समीरसिंह साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथक व ठसेतज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Robbery at Deothan